मुंबई / नगर सह्याद्री : सैराट हा मराठी चित्रपट अत्यंत गाजला. कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने त्यावेळी कोट्यवधी रुपये कमावले. या सिनेमातील अभिनेता, अभिनेत्री असणाऱ्या आरची परशाला सुरवातीला अवघ्या काही लाखांत करारबद्ध केले होते. पण चित्रपट हिट झाल्यानंतर बोनस म्हणून किती कोटी मिळाले? जाणून घेऊयात –
‘सैराट’ या मराठी चित्रपटाला माऊथ पब्लिसिटीचा खूप फायदा झाला. हा चित्रपट सुपरडूपर हिट झाला. ग्रामीण महाराष्ट्राने हा चित्रपट उचलून धरला. सैराटमधून ग्रामीण भागातील जाती व्यवस्थेवर भाष्य करण्यात आलं होतं. अत्यंत कमी बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट होता.
अवघ्या 4 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवण्यात आला होता. रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांची चित्रपट सृष्टीची पार्श्वभूमी नव्हती. अत्यंत सामान्य कुटुंबातून हे दोघे आले होते. त्यामुळे ही जोडी प्रेक्षकांना जास्त भावली. या चित्रपटाने नागराज मंजुळे यांनाही दिग्दर्शक म्हणून एक वेगळी ओळख मिळाली. या चित्रपटाने भारतात तब्बल 80.98 कोटींची कमाई केली.
जगभरात या चित्रपटाच कलेक्शन 110 कोटी रुपये होतं. अभिनेत्री असणाऱ्या आरची परशाला सुरवातीला 4 लाखांत करारबद्ध केले होते. पण चित्रपट हिट झाल्यानंतर बोनस म्हणून त्यांना पाच पाच कोटी रुपये मिळाले अशी चर्चा विविध मीडियात सुरु होती.