Maratha Reservation:
मराठा आरक्षणाच्या मागणीने राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. मराठा समाजाचा संघर्ष योद्धा मनोज जरागे पाटील यांच्या अंदोलनाला अनेकांनी पाठींबा देत मोठी अंदोलने उभारली होती. काही विद्यार्थ्यांनी देखील अंदोलनात सहभाग नोंदवला होता. त्यातच अत्ता एका विद्यार्थ्याने ज्यशास्त्राचा पेपरच्या पहिल्याच पानावर मराठा आरक्षणाबाबत मचकुर लिहत आरक्षणाची मागणी केली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरागे पाटील दुसऱ्यांदा उपोषणाला बसले होते. अनेक गावातील गावकर्यांनी पुढाऱ्यांना गाव बंदी करण्यात आली होती. अनेक आदोलने करण्यात आले होते.
अनेक विद्यार्थ्यांनी आदोलनात सहभाग आरक्षणाची मागणी केली होती. त्यातच अत्ता प्रथम सत्र परीक्षा सुरु आहे. परीक्षेचा दरम्यान संकेत लक्ष्मण साखरे नावाच्या विद्यार्थ्याने राज्यशास्त्राचा पेपरवर ‘जय जिजाऊ, जय शिवराय जय शंभुराजे,एक मराठा कोटी मराठा असा संदेश लिहत मराठा रक्षणाची मागणी केली आहे.