नगर सहयाद्री टीम-
देशातील खाद्यतेलाची वाढती मागणी विचारात घेता, जनतेला वाजवी दरात खाद्यतेल उपलब्ध देणे, विदेशी मुद्रा वाचविण्याच्या दृष्टीने आणि देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला चांगला दर मिळावा यादृष्टीने राज्यात राईस ब्रान खाद्यतेल उद्योग उभारले जात आहे.
तांदूळ तयार करताना कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या कुक्कुसात ५ टक्के तेलाचे प्रमाण असते. तांदळापासून तयार होणारे हे खाद्यतेल (राइस ब्रान ऑइल) मानवी आरोग्याला सर्वाधिक पोषक आहे. त्याला भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड मागणी आहे.
या तेलामध्ये कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासह अनेक आरोग्यदायी फायदे आहेत आणि हे तेल आरोग्यवर्धक म्हणून कार्य करते. कर्करोगाचा धोका कमी करते. भाताच्या कोंड्यापासून तयार केलेले शुद्ध तेल ‘अ’ आणि ‘ड’ जीवनसत्वांसाठी आवश्यक आहारातील 25-30% तत्त्वांची पूर्तता करते.