नगर सहयाद्री / मुंबई देशातून मान्सून पूर्णपणे माघारी परतला असून अनेक राज्यांमध्ये थंडी पसरली आहे. महाराष्ट्राच्या काही भागात तापमानात घट झाली आहे.
त्यामुळे लोक शेकोटीचा आधार घेत आहेत. दुसरीकडे खरीप हंगामातील पिकांच्या काढणीला वेग आला आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाने (आयएमडी) राज्याच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रब्बी हंगामात राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकणासह मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. याशिवाय काही जिल्ह्यांमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहील.
सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आहे. सध्या कोकण किनारपट्टी भागात सकाळी गुलाबी थंडी आणि दुपारी उन्हाचा चटका असं हवामान पाहायला मिळत आहे. दुसरीकडे मुंबई, पुण्यासह ठाण्यातील तापमानात वाढ कायम आहे.
केरळमध्ये मुसळधार : महाराष्ट्रापाठोपाठ केरळमध्येही अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.