नगर सह्याद्री टीम : संकटे येत असतात. परंतु या संकटाचे संधीमध्ये रूपांतर करण्याचे कौशल्य फार कमी लोकांना येते. ज्यांना हे जमते ते मात्र मोठी प्रगती करतात. आज आपण याठिकाणी अशाच एका पंजाबमधील मोहाली मध्ये राहणाऱ्या व्यक्ती विषयी पाहणार आहोत की ज्याने लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावली. परंतु याची चिंता करण्याऐवजी एक व्यवसाय सुरू केला. हा अनोखा व्यवसाय सिगारेटच्या बट्सच्या रीसाइक्लिंगशी संबंधित आहे.
सिगारेटचा पुनर्वापर करून कमवतोय पैसा
अनेकदा सिगारेट ओढल्यानंतर लोक त्याचा फिल्टर निरुपयोगी मानून कुठेही फेकून देतात. पण आज ट्विंकल कुमार तेच फिल्टर गोळा करून लाखो रुपये कमवत आहे. त्याने सांगितले की सिगारेटच्या बट्स चा पुनर्वापर खेळणी, कुशन आणि अगदी डास प्रतिबंधक औषध मध्ये केला जाऊ शकतो. या कल्पनेमुळे आज तो एक यशस्वी व्यापारी झाला आहे आणि त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
युट्यूब व्हिडिओंमधून आयडिया आली
एका मुलाखतीत ट्विंकल कुमार म्हणाले, ‘जेव्हा मी माझी नोकरी सोडली, तेव्हा मी बहुतेक वेळ यूट्यूबवर घालवायला सुरुवात केली. याच काळात मला सिगारेटच्या पुनर्वापराची कल्पना सुचली. त्यानंतर मी खूप संशोधन केले आणि शेवटी मी हा व्यवसाय सुरु करण्याचा विचार केला. माझ्यापुढील सर्वात मोठे आव्हान म्हणजे सिगारेट फिल्टर एकत्र करणे. यासाठी मी अनेक दुकानदारांशी बोललो आणि तिथे कंपनीने संबंधित महिलांना तैनात केले. सुरुवातीला प्रत्येकजण सिगारेटचे बट्स गोळा करण्यात संकोच करत असत, पण हळूहळू या कामाचा आनंद ते घेऊ लागले.
अशा पद्धतीने कामाला वेग आला
“संध्याकाळपर्यंत, जेव्हा सिगारेटचे बरेच बट्स गोळा केले जात असत, तेव्हा त्यांच्या पुनर्वापरामध्ये गुंतून जायचो. यापासून बनवलेल्या कुशन, खेळणी वगैरे आम्ही बाजारात विकायचो. हळूहळू आमच्या कामाला गती येऊ लागली. यानंतर, थोडे पैसे गुंतवून, आम्हाला प्रत्येक दुकानात 1-1 बॉक्स ठेवले जेणेकरून लोक सिगारेट ओढल्यानंतर त्यांचे फिल्टर बॉक्समध्ये ठेवू शकतील. यामुळे सिगारेटचे बट एकत्र करणे सोपे झाले आणि आम्ही उत्पादने अधिक जलद बनवू लागलो. नोएडामध्ये राहणाऱ्या माझ्या एका मित्रानेही या कामात खूप मदत केली असे ते म्हणतात. आज या व्यवसायातून ते लाखो रुपये कमावत आहेत.