मुंबई। नगर सहयाद्री-
आरबी समुद्ररात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्यामुळे महाराष्ट्रातील काही भागात पाऊस पडण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली असुन राज्यात काही दिवसापर्यत ढगाळ वातावरण असल्यामुळे महिन्यांच्या पूर्वरार्धात थंडीचा जोर कमी राहणार आहे.
अरबी समुद्रात सोमवारी कमी दाबाचा पट्टा तयार झाला. त्यामुळे वाऱ्याची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. केरळ किनारपट्टीपासून ते दक्षिणपूर्व अरबी समुद्रात खालच्या व मध्यम भागात हवेची चक्रीय स्थिती तयार झाली आहे.
त्यामुळे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने कोकण व मध्य महाराष्ट्रात पुढील सहा ते सात दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तर, उर्वरित राज्यात काही दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याने थंडी कमी जाणवणार आहे.