नगर सह्याद्री टीम : महागाईच्या जमान्यात सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वांकडे पैसा असतोच असे नाही. त्यामुळे अनेक लोक बँकांकडून कर्ज घेतात. बँकाही लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज देतात. ऑटो लोन, पर्सनल लोन, होम लोन, एज्युकेशन लोन, बिझनेस लोन आदी कर्ज बँकांकडून घेतले जातात. आता कर्ज घेणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी आहे. एचडीएफसी बँकेने आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे.
बँकेने व्याजदरात केली वाढ
एचडीएफसी बँकेने खासगी क्षेत्रातील कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने व्याजदरात 0.05 टक्के वाढ केली आहे. हे ठराविक कर्ज अवधीसाठी हे करण्यात आले आहे. बँकेच्या मालमत्ता उत्तरदायित्व समितीची बैठक झाली. मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड इंटरेस्ट रेट (एमसीएलआर) 0.05 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
कर्ज फेडण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागणार
बँकेने कर्जावरील दरवाढ केल्याने आता कर्जावर अतिरिक्त व्याज भरावे लागणार आहे. यामुळे लोकांच्या खिशावरही मोठा परिणाम होऊ शकतो. याशिवाय त्यांना कर्ज म्हणून अधिक पैसे द्यावे लागतील. त्यामुळे लोकांच्या खिशालाही फटका बसणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मागील काही दिवसांपासून रेपोदर स्थिर ठेवला आहे. मात्र, असे असले तरीही बँकेने व्याजदरात वाढ केली आहे. एचडीएफसी लि. विलीनीकरणानंतर बँकेचे निव्वळ व्याज मार्जिन कमी झाले आहे.
सुधारित व्याजदरानुसार एक दिवसाचा एमसीएलआर सध्याच्या 8.60 टक्क्यांवरून 8.65 टक्के करण्यात आला आहे. त्याचबरोबर तीन वर्षांचा एमसीएलआर 9.25 टक्क्यांवरून 9.30 टक्के करण्यात आला आहे. मात्र, एक वर्षाचा एमसीएलआर 9.20 टक्के कायम ठेवण्यात आला आहे.