नगर सह्याद्री टीम : सध्या कुणबी नोंदी शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन झाल्यानंतर शासन प्राशासन कामाला लागले आहे.
प्रत्येक जिल्ह्यात कुणबी च्या नोंदी शोधण्याचे काम सुरु आहे. यात कोणत्या जिल्ह्यात किती नोंदी सापडल्या याची एक आकडेवारीआपण पाहुयात – राज्यातील अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक 57 हजार 688 कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यात 45 हजारापेक्षा जास्त नोंदी सापडल्या आहेत.
कोणत्या जिल्ह्यात किती कुणबी नोंदी
छत्रपती संभाजीनगर – 932 कुणबी नोंदी सापडल्या
जालना – 2764 कुणबी नोंदी सापडल्या
परभणी – 1466 कुणबी नोंदी सापडल्या
हिंगोली – 3130 कुणबी नोंदी सापडल्या
बीड – 3994 कुणबी नोंदी सापडल्या
नांदेड – 389 कुणबी नोंदी सापडल्या
लातूर – 363 कुणबी नोंदी सापडल्या
धाराशिव – 459 कुणबी नोंदी सापडल्या
अहमदनगर – 57,688 कुणबी नोंदी सापडल्या
धुळे – 31,453 कुणबी नोंदी सापडल्या
कोल्हापूर – 5566 कुणबी नोंदी सापडल्या
रत्नागिरी – 69 कुणबी नोंदी सापडल्या
पुणे – 20,000 कुणबी नोंदी सापडल्या
सांगली – 2211 कुणबी नोंदी सापडल्या
सोलापूर – 2187 कुणबी नोंदी सापडल्या
जळगाव – 45,728 कुणबी नोंदी सापडल्या