पुणे /नगर सह्याद्री : महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. आता आणखी एक राजकीय वृत्त आले आहे. मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी खासदार शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली.
वळसे पाटील हे सध्या अजित पवार गटात आहेत. त्यांची ही भेट सध्या राजकीय चर्चेचा विषय झाली आहे. पुण्यातील मोदी बागेतील निवासस्थानी त्यांची भेट झाली. ही भेट दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी असल्याचे बोलले जात आहे. येथे अनेक नेते पवार यांना भेटण्यासाठी आलेले होते.
दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांचे अत्यंत निकटवर्तीय होते. परंतु त्यांनी अजित दादांसोबत जात सत्तेत सहभागी झाले. सत्तेत त्यांना सहकार खातं मिळालं आहे. काल राष्ट्रवादी संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी झाली. तर दुसरीकडे आज मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली आहे.
यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. ही भेट दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या, याचे निकालही समोर आले. या निवडणुकीत दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघातील मोठ्या ग्रामपंचायती शरद पवार गटाने जिंकल्या आहेत, ही देखील पार्श्वभूमी या भेटीला आहे. यामुळे राजकीय चर्चाही जोरदार सुरू आहेत.