नगर सहयाद्री टीम : शून्यातून विश्व निर्माण करता येते ही उक्ती खरी करून दाखवली आहे बी.एल.बेंगानी यांनी. राजस्थानमधील रहिवासी बी.एल.बेंगानी यांचे बालपण अतिशय तंगीमध्ये गेले. घराची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. वडील कोलकाता येथील जूट गिरणीत काम करायचे.
ते ही त्यांच्याबरोबर तेथेच राहिले. अशाप्रकारे कुटुंबाचा खर्च भागविला जायचा. दहावीनंतर बेनगानी देखील एका कंपनीत कामाला लागले. त्यांना ऑफिस बॉय म्हणून नोकरी मिळाली. दरमहा 100 रुपये मिळत. तेथून प्रवास सुरु केला आज बीएल बेंगानी हे कोट्यवधी रुपयांच्या कंपनीचे मालक आहेत. ते पेंढा आणि (एग्रीकल्चर वेस्ट) शेती कचर्यापासून प्लायवुड बनवत आहेत आणि देशभरात पुरवठा करीत आहेत.
* अभ्यासाबरोबर नोकरीही
बेंगानी सांगतात की आमचे कुटुंब 80 च्या दशकात राजस्थानहून कोलकाता येथे गेले. वडील कारखान्यात काम करायचे, पण पगार खूप कमी होता. म्हणूनच मी दहावीनंतर संध्याकाळच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला जेणेकरून अभ्यासाबरोबरच मी एखादे काम करू शकेन. मी संध्याकाळी कॉलेजला जायचो आणि दिवसा ऑफिस बॉय म्हणून काम करायचो. मला काहीतरी करण्याची तीव्र इच्छा होती आणि मी आर्थिकदृष्ट्या चांगला नव्हतो. णे प्रथम बारावी पूर्ण केली व त्यानंतर वाणिज्यमधून पदवी घेतली. ते म्हणतात की येथून रस्ता सुकर झाला. काही ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला. त्यानंतर चेन्नईतील एका कंपनीत नोकरी मिळाली. मला अकाउंटंटची नोकरी मिळाली. पगार फारसा चांगला नव्हता, परंतु चालू काम भागेल इतके उत्पन्न सुरु होते.
* प्लायवुड कंपनीची नोकरी टर्निंग पॉइंट
येथे काही वर्षे काम केल्यावर बेंगानी यांना प्लायवुड कंपनीत नोकरी मिळाली. येथे त्याला मार्केटींगची नोकरी मिळाली. हे कार्य बेनगानीसाठी महत्त्वपूर्ण टर्निंग पॉइंट ठरले. आपल्या कामादरम्यान, त्यांनी अनेक शहरे फिरली आणि वेगवेगळ्या प्लायवुड्सबद्दल माहिती देखील घेतली. हळूहळू त्यांना प्लायवुडचे काम आणि बाजारपेठ समजू लागली. बेंगानी सांगतात की मला माझे स्वतःचे काहीतरी सुरुवातीपासूनच सुरू करायचे होते, परंतु पैशाअभावी कोणताही निर्णय घेता आला नाही. जेव्हा मला समजले की आता काही बचत झाली आहे आणि बाजारपेठेबद्दलचे माझे ज्ञान देखील चांगले झाले आहे, तेव्हा मी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला.
2000 मध्ये बेंगानी याचना स्वतःची प्लाईवुड कंपनी सुरु केली. म्यानमारसारख्या देशांकडून उच्च प्रतीची प्लायवुड खरेदी करीत असत आणि ते भारतात बाजारात आणत असे.
यानंतर त्यांनी चेन्नईमध्ये स्वतःचा कारखाना सुरू केला. त्यांनी प्लायवुड बनवायला सुरवात केली. लवकरच त्यांनाही त्याचा फायदा झाला. एकामागून एक, मोठ्या विक्रेत्यांशी करार होत गेला. त्यांनी चेन्नईच्या बाहेर स्वतःच्या उत्पादनांचे मार्केटिंग करण्यास सुरवात केली. त्यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल करोडोंच्या पार गेली. तथापि, 2015 मध्ये, बेंगानी यांनी ही कंपनी विकली. आणि नवीन इको-फ्रेंडली मॉडेलवर काम करण्यास सुरवात केली.
* उत्पादने कशी तयार करतात?
त्यांचे म्हणणे आहे की सध्या आम्ही भात गिरणीकडून धान पेंढा घेत आहोत, पण भविष्यात थेट शेतकर्यां पर्यंत पोहोचण्याची आमची योजना आहे. याद्वारे आम्ही त्यांना मदत करू शकू आणि त्यांना पेंढाच्या समस्येवर तोडगा देखील मिळेल. पेंढा कारखान्यात आणल्यानंतर त्यास अनेक स्तरांवर प्रक्रिया करावी लागते. यासाठी त्यांनी आपल्या कारखान्यात मशीन्स बसविली आहेत. सर्वप्रथम, फायबर तयार करण्यासाठी पेंढावर प्रक्रिया केली जाते. मशीनच्या मदतीने या फायबरवर पुन्हा प्रक्रिया करून प्लायवुड तयार केला जातो. अशा पद्धतीने त्यांनी अगदी शून्यातून विश्व निर्माण करत आज आपला व्यवसाय खूप उंचीवर नेऊन ठेवला आहे.