जालना / नगर सहयाद्री : मराठा आरक्षण मुद्द्यावर एकीकडे चांगलेच रण पेटले असताना आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा घणाघात मनोज जरांगे यांच्यावर केला होता. परंतु आता जरांगे पाटील यांनी याविरोधात देखील टिपणी करत वडेट्टीवारांवर घणाघात केला आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे ?
विरोधी पक्षनेते आणि विधिमंडळ ही न्यायाची मंदिरे आहेत. आता आपल्या जातीचा अभिमान बाळगणारा विरोधी पक्षनेता राज्यघटनेत आहे का? सरकारने न्याय दिला नाही तर विरोधी पक्षनेते मोठा आवाज उठवतात आणि सरकारला वाकवतात. राहुल गांधींनी हे शिकवले का? मराठ्यांविरोधात आवाज उचलतो, त्यासाठी राहुल गांधींनी पद दिलंय का असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर केला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, २४ तारखेनंतर मी सर्वांना दाखवून देईन, माझ्या गरीब मुलांना आरक्षण द्या, ही धमकी आहे असे तुम्हाला वाटते का? राहुल गांधींनी तुम्हाला मराठ्यांच्या विरोधात बोलायला पाठवलं का? विरोधी पक्षनेता हा जनतेचा आवाज असतो. क्षत्रीय मराठ्यांविरोधात बोलला तर तुझ्या पाठीवर थाप टाकू असं राहुल गांधींनी सांगितलंय का? आम्ही बोललो, धमकी कुठे दिली. सरकारला वाईट
बोलले तर तुम्हाला काय झालं? तुमच्या राजकारणात आम्हाला का डाग लावताय? राजकारणासाठी करत असतो तर मराठवाड्याला आरक्षण मिळत असताना समितीला राज्यभरातील मराठ्यांसाठी काम करायला लावलं नसतं. माझा मराठा समाज कानाकोपऱ्यात एक झालंय याचा मला आनंद आहे असं त्यांनी म्हटलं.