नगर सह्याद्री टीम : World Cup 2023 : क्रिकेटपटूंना भरपूर पैसे मिळतात हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. मग तो टी-२० असो किंवा सध्याचा विश्वचषक. हे खेळाडू कोट्यवधी रुपये कमावतात.
या खेळाडूंच्या कमाईबाबत नेहमीच उत्सुकता असते. आता विशेष चर्चा आहे की, उद्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील विजेत्यांना किती पैसे दिले जातील? तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की विजेत्या संघाला कोट्यवधी रुपये तर मिळतीलच पण हरलेल्या संघालाही भरपूर कमाई होणार आहे.
विजेत्या संघास 40 लाख डॉलर (सुमारे 33.17 कोटी रुपये) बक्षीस
उद्या भारत व ऑस्ट्रेलिया यांमध्ये सामना रंगेल. यामध्ये जो संघ उपविजेता होईल त्या संघाला 20 लाख डॉलर्स (सुमारे 16.58 कोटी रुपये) तर सामना जिंकणाऱ्या संघाला 40 लाख डॉलर (सुमारे 33.17 कोटी रुपये) बक्षीस दिले जाईल.
इतर हरलेल्या संघांना किती पैसे मिळणार ?
उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेला आठ लाख डॉलर (सुमारे 6.63 कोटी रुपये) मिळणार आहेत. याशिवाय साखळी फेरीतून बाहेर पडणाऱ्या सहा संघांना प्रत्येकी एक लाख डॉलर म्हणजेच सुमारे 82 लाख रुपये मिळणार आहेत.
याशिवाय आयसीसीने साखळी फेरीतील प्रत्येक सामना जिंकणाऱ्या प्रत्येक संघासाठी स्वतंत्र बक्षिसाची रक्कम ठेवली होती. या संघाना $ 40,000 म्हणजेच अंदाजे 33.17 लाख रुपयांचे बक्षीस मिळालेले आहे.