अहमदनगर | नगर सह्याद्री –
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलग १० सामन्यांमध्ये विजय मिळवत अजिंय राहिलेल्या भारतीय क्रिकेट संघाने रविवारी होणारा अंतिम सामानही जिंकून क्रिकेटचा विश्वचषक जिंकावा यासाठी नगरच्या विजेता क्रिकेट लबच्या वतीने शनिवारी ग्रामदैवत श्री विशाल गणेशाच्या चरणी विश्वचषकाची प्रतिकृती ठेवून महाआरती करून साकडे घालण्यात आले. श्री विशाल गणपती मंदिराचे पुजारी संगमनाथ महाराज यांच्या उपस्थितीत आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते विश्वचषक प्रतिकृती गणेशाच्या चरणी ठेवून महाआरती करण्यात आली.
तसेच येत्या डिसेंबर महिन्यात वाडियापार्क मैदनावर होणार्या विजेता करंडक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धाही यशस्वीपणे पार पडावी यासाठीही यावेळी प्रार्थना करण्यात आली. यावेळी ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सचे मार्गदर्शक बाबूशेठ बोरा, बडीसाजन ओसवाल श्री संघाचे सचिव विशाल शेटिया, नगरसेवक विपुल शेटिया, प्रकाश भागानगरे, अतुल शिंगवी, अभिनंदन भन्साळी, मर्चंट बँकेचे संचालक कमलेश भंडारी, किशोर बोरा आदींसह विजेता क्रिकेट लबचे सर्व सदस्य उपस्थित होते.
आ. संग्राम जगताप म्हणाले, विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारतीय संघ सर्व सामने जिंकून अपराजित राहिला आहे. विजयाचे हेच सातत्य अंतिम सामन्यातही ठेवून भारतीय संघाने विश्वचषक जिंकून सर्व भारतीयांची इच्छा पूर्ण करावी. यासाठी श्री विशाल गणेशाचे आशीर्वाद भारतीय संघास मिळावेत. आपला भारत देश अध्यात्म व धर्माच्या विचाराने चालणारा देश आहे. क्रिकेट जरी खेळाडूंच्या कौशल्यावर खेळले जात असले तरी भगवंताचा आशीर्वाद हा सकारात्मक उर्जा देणारा आहे. त्यामुळे विजेता क्रिकेट लबने श्रद्धेने हा उपक्रम राबवला आहे. आम्हा सर्वांना खात्री आहे की श्री विशाल गणेशाच्या आशीर्वादाने भारतीय संघ नक्कीच विश्वचषक स्पर्धेत अजिंय राहून वर्ल्ड कप जिंकून सर्वांचे स्वप्न साकार करेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी विजेता क्रिकेट लबचे अमोल शिंगवी यांनी प्रास्ताविक केले, हर्ष बोरा यांनी आभार मानले.
क्रिकेट विश्वचषकात विजयासाठी हनुमान चालीसा, महाआरती
रोमांचक क्षणी पोहचलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताचा विजय होण्यासाठी भिंगार येथील हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी रोकडेश्वर हनुमान मंदिरात शनिवारी (दि.१८ नोव्हेंबर) पहाटे हनुमान चाळीसा पठण करुन महाआरती केली. तर जॉगिंग पार्क मधील भगवान गौतम बुद्ध चरणी मेणबत्त्या प्रज्वलीत करुन विजयासाठी प्रार्थना करण्यात आली. पूजेनंतर हातात तिरंगे ध्वज घेऊन भारत माता की जय…, वंदे मातरम… जीतेंगा भाई जीतेंगा भारत जीतेंगाच्या घोषणानी परिसर दणाणून निघाला.
भारताच्या विजयासाठी परिसरातून हातात तिरंगे ध्वज घेऊन प्रभातफेरी देखील काढण्यात आली. यावेळी हरदिनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, बापूसाहेब तांबे, सर्वेश सपकाळ, संजय वाकचौरे, अभिजीत सपकाळ, मेजर दिलीप ठोकळ, मनोहर दरवडे, दीपक धाडगे, अविनाश जाधव, प्रवीण दुराफे, सुमेश केदारे, सचिन चोपडा, विठ्ठल राहिंज, राजू कांबळे, शंकरराव पंगुडवाले, सरदारसिंग परदेशी, अशोक पराते, अशोक लोंढे, विलास तोतरे, दिलीप गुगळे, धनंजय नामदे, राधेश्याम ठाकूर, राजदेव दीक्षित, पंढरीनाथ बनकर, विनोद यादव, सुधीर तेलंगे, अमोल धाडगे, दिलीप बोंदर्डे, नामदेवराव जावळे, रामनाथ गर्जे, सिताराम परदेशी, नवनाथ वेताळ, जालिंदर अळकुटे, पार्वती रासकर, वनिता दळे, राजश्री राहिंज, निर्मला जाधव, रंजना झिंजे, निर्मला पांढरे, मालंदा हिंगणे, रिता दीक्षित, कृष्णा साठे, महेश सरोदे, आनंद सदलापूर, कुमार धतुरे, मच्छिंद्र बेरड, राजू शेख, जालिंदर बेरड, शरद धाडगे, भाऊसाहेब गुंजाळ, सिद्धू तात्या बेरड, बबनराव चिंचिणे, छगन लंगोटे, सुनील झोडगे, दिपक टाक, सुदर्शन भिंगारदिवे, सुनिल थोरात, दत्तात्रय बोरबणे, ड. भाऊसाहेब पल्लोड, डॉ. विजय भंडारी, जाहीर सय्यद, विशाल भामरे आदी उपस्थित होते.
रविवारी (दि.१९ नोव्हेंबर) क्रिकेटच्या विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताचा संघ भिडणार आहे. २००३ नंतर दुसर्यांदा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वविजेते पदासाठी लढत रंगणार आहे. अनेक संघांना संघांना चारीमुंड्या करत भारतीय संघाने दिमाखात विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. या अंतिम सामन्यात भारताने विजय मिळवून विश्वचषक जिंकावा यासाठी हनुमान चरणी व भगवान गौतम बुध्दांकडे प्रार्थना करण्यात आली. पूजेदरम्यान, क्रिकेटप्रेमी हातात तिरंगा घेऊन आणि शंखनाद करताना दिसले.
संजय सपकाळ म्हणाले की, यावर्षी भारताने आक्रमक खेळी करुन सर्वांची मने जिंकली आहे. उत्कृष्ट फलंदाजी व गोलंदाजीच्या जीवावर भारताचे पारडे जड आहे. सर्व भारतीयांची विश्चचषक जिंकण्याची मनापासून इच्छा आहे. भारत हा सामना भरघोस यशाने जिंको अशी देवाला प्रार्थना करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय क्रिकेट संघ पुन्हा एकदा विश्वचषकाला गवसणी घालेल : विक्रम फिरोदिया
भारतीय क्रिकेट संघ २०११ नंतर पुन्हा एकदा एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचला आहे. आताच्या विश्वचषकात सलग दहा सामने जिंकण्याची विराट कामगिरी प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली व कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालील संघाने केली आहे ् आता रविवारी अहमदाबाद येथील सामान्यातही भारतीय संघ विजयाची मालिका कायम ठेवत विश्वचषकाला गवसणी घालेल. १४० कोटी भारतीयांना पुन्हा एकदा दिवाळीची आतषबाजी करण्याची संधी मिळेल असा विश्वास अहमदनगर ग्राहक भांडारचे चेअरमन व उद्योजक विक्रम प्रकाश फिरोदिया यांनी व्यक्त केला.
रविवारी अहमदाबाद येथे एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना भारत व ऑस्ट्रेलिया संघात रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर जय आनंद महावीर युवक मंडळाने नगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात महाआरती करून भारताच्या विजयासाठी बाप्पाला साकडं घातले. यावेळी जय आनंद महावीर युवक मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत, शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, विशाल गणपती मंदिराचे ट्रस्टचे अशोक कानडे, पुजारी संगमनाथ महाराज, सेक्रेटरी आनंद मुथा, महिला सेक्रेटरी सुरेखा बोरा आदींसह मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत यांचा मंदिर ट्रस्ट तर्फे अशोक कानडे यांनी सत्कार केला.
विक्रम फिरोदिया म्हणाले की, देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विशाल गणपती मंदिरात भारतीय संघाच्या विजयासाठी केलेली प्रार्थना निश्चितच फलद्रूप होईल. यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघाने अप्रतिम खेळ केला आहे. प्रत्येक सामना समोरच्या संघावर निर्विवाद वर्चस्व राखून जिंकला आहे. रोहित शर्मा, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, के. एल.्राहुल यांनी फलंदाजीत कमालीचे सातत्य राखले आहे. विराट कोहलीने तर सेमिफायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध खेळताना शतकांचे अर्धशतक रचण्याचा भीम पराक्रम केला. गोलंदाजीत मोहंमद शमीचा सर्वच विरोधी संघांनी धसका घेतला आहे. यावेळी भारतीय खेळाडू पहिल्या सामन्यापासून विजेत्यांच्या मानसिकतेत खेळताना दिसून आलेत. त्यांची हीच लय अंतिम सामन्यातही कायम राहील आणि १२ वर्षांनतर भारतीय टिम पुन्हा विश्वविजेता बनेल हीच तमाम भारतीयांची इच्छा आहे. कोट्यावधी लोकांचे शुभेच्छांचे पाठबळ प्रत्येक खेळाडूला ऊर्जा देईल असेही फिरोदिया यांनी म्हटले.