नगर सह्याद्री / गुजरात : सध्या भारत ऑस्ट्रेलिया फायनलसुरु आहे. ऑस्ट्रेलियाने नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व गाजवले. नाणेफेक जिंकल्यावर पॅट कमिन्सने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
परंतु भारताची दैना झाली. विराट कोहली व लोकेश राहुल यांच्या वैयक्तिक अर्धशतकांनी टीम इंडियाची लाज वाचवली.भारताने ५० षटकांत सर्वबाद २४० धावा केल्या. ऑस्ट्रेलियापुढे आता २४१ रणांचे टार्गेट आहे. रोहित शर्माच्या ( ४७) आक्रमक सुरुवातीच्या जोरावर भारताने पहिल्या १० षटकांत २ बाद ८० धावा फलकावर चढवल्या होत्या.
पण, शुबमन गिल ( ४) व श्रेयस अय्यर ( ४) हे अपयशी ठरले. विराट कोहली व लोकेश राहुल यांनी डाव सावरला होता, परंतु ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी त्यांना दबावाखाली ठेवले होते.
या दोघांची १०९ चेंडूंत ६७ धावांची भागीदारी पॅट कमिन्सने तोडली. विराट ६३ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने ५४ धावांवर बाद झाला. त्यानं डाव गडगडला. आता ऑस्ट्रेलियाची बॅटिंग असून भारतीय गोलंदाजांनी कमाल केली तर भारत विजयी होईल यात शंका नाही.