पारनेर /नगर सह्याद्री :
Ahmedanagr News : भाळवणीच्या विविध विकास कामांसाठी खा. डाॅ. सुजय विखे पाटील (MP SUJAY VIKHE) यांच्या माध्यमातून सव्वाचार कोटींचा निधी मंंजूर झाल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख विकास रोहोकले यांनी दिली.
मंजूर कामांबाबत माहिती देताना रोहकले म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामस्थांनी पुन्हा संधी दिली. या संधीचे सोने लाभ विकासकामे मार्गी लावून करणार आहे. मंजूर कामांमध्ये पाण्याची भूमिगत टाकी बांधण्यासाठी ४० लाख, भाळवणी चौक सुशोभिकरण १० लाख, भाळवणी ते डोंगरवाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण १५ लाख, भाळवणी ते चेमटे मळा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण १५ लाख, भाळवणी ते नारायणनगर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण १५ लाख, नारायणनगर ते आमली रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण १५ लाख,
लकडेमळा ते लोंढे मळा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण १५ लाख, पांदडवाडी ते खारवाडी शिवपाणंद रस्ता २५ लाख, सबस्टेशन ते चेमटेमळा शिवपाणंद रस्ता करणे २५ लाख, नागबेंदवाडी रोड ते येवले वस्ती शिवपाणंद रस्ता २५ लाख, नागबेंदवाडी रोड ते दळवी वस्ती ते लोंढेवस्ती शिवपाणंद रस्ता २५ लाख, भाळवणी ते पिराचा मळा शिवपाणंद रस्ता २५ लाख, भाळवणी ते चेमटेमळा शिवपाणंद रस्ता २५ लाख, खारवाडी रोड ते वैराळ वस्ती शिवपाणंद रस्ता २५ लाख,
लोंढे मळा ते भुजबळ वस्ती शिवपाणंद रस्ता २५ लाख, लकडे मळा ते लोंढे वस्ती शिवपाणंद रस्ता २५ लाख, एन एच २२२ ते फार्म रस्ता शिवपाणंद रस्ता २५ लाख, माळवाडी ते आमली शिवपाणंद रस्ता २५ लाख, मावळवाडी ते आमली शिवपाणंद रस्ता २५ लाख, दहावा मैल रस्ता ते निमगाव रस्ता शिवपाणंद रस्ता २५ लाख आदी कामांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या कामांना निधी मंजूर करण्यासंदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे तसेच खासदार डॉ. सुजय विखे यांच्याकडे आपण पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यास यश आले असून लवकरच या कामांचा प्रर्मभ करण्यात येणार असल्याचे रोहोकले म्हणाले.
गौण खनिज योजनेतूनही निधी
माळवाडी ते गंगा गुरूजी घरापर्यंत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी २५ लाख तर नागबेंदवाडी ते खारवाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी २५ लाख रूपयांचा निधी गौण खनिज योजनेतून मंजूर करण्यात आल्याचे रोहोकले यांनी सांगितले.