spot_img
अहमदनगरAhmednagar Breaking : धक्कादायक! रस्त्यांच्या कामात कोट्यावधींचा भ्रष्टाचार; काँग्रेसची अँटी करप्शनकडे फिर्याद

Ahmednagar Breaking : धक्कादायक! रस्त्यांच्या कामात कोट्यावधींचा भ्रष्टाचार; काँग्रेसची अँटी करप्शनकडे फिर्याद

spot_img

Ahmednagar Breaking : शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे १ डिसेंबरला घेणार अप्पर महासंचालक नांगरे पाटील यांची भेट
अहमदनगर | नगर सह्याद्री – 
नगर शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. याला राजकीय वरदहस्तातून मनपा अधिकारी, ठेकेदारांच्या संगममताने झालेला मनपा व शासकीय निधीचा अपहार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे. काळे यांनी ७७६ रस्त्यांच्या कामात नगर शासकीय तंत्रनिकेतनच्या नावे कामांचे गुणवत्ता टेस्ट रिपोर्ट, थर्ड पार्टी रिपोर्ट तयार करण्यासाठी तंत्रनिकेतन, राजपत्रित अधिकारी यांच्या नावे बनावट शिक्के, लेटरहेड तयार करून रस्त्यांच्या कामात कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करत भ्रष्टाचार केल्याप्रकरणी अँटी करप्शनचे राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील व नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा धाडगे यांच्याकडे ऑनलाईन फिर्याद दाखल केली आहे. निकृष्ट कामे करणारे बहुतांशी ठेकेदार राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचा गंभीर आरोप काळे यांनी केला आहे. याबाबतची सविस्तर काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी त्यांनी पुराव्यांची शेकडो कागदपत्र पत्रकारांना दाखवली. काळे यांनी फिर्यादीत सध्याचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्यासह सन २०१६ ते २०२३ मधील ८ आयुक्त, शहर अभियंता मनोज पारखे, अभियंता श्रीकांत निंबाळकर, सेवानिवृत्त शहर अभियंता सुरेश इथापे यांच्यासह ६ शहर अभियंते, बांधकाम विभागाचा चार्ज असणारे सात वर्षातील सर्व उपायुक्त, बांधकाम, लेखा विभागातील कर्मचारी, ठेकेदार, त्यांच्या संस्थांचे प्रोप्रायटर, भागीदार, ऑडिटर, शासकीय तंत्रनिकेतन, अहमदनगर तसेच ज्या, ज्या शासकीय, निमशासकीय संस्था यांनी बनावट गुणवत्ता चाचणी अहवाल दिले, त्या प्रक्रियेशी निगडित सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्या विरुद्ध सामूहिक संगनमत करत कट कारस्थान रचून रस्त्यांच्या कामात शासन व जनतेची फसवणूक करत भ्रष्टाचार केल्याची फिर्याद दिली आहे.

निकृष्ट दर्जाची कामे करून नगर शहराला खड्ड्यात घालणार्‍या दोषींवर लाच लुचपत प्रतिबंधक कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करावा, असे काळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. फसवणूक करणे, अपहार, भ्रष्टाचार करणे, बनावट दस्तऐवज तयार करणे, पुरावे नष्ट करणे, उपकरणांचा उपयोग करून खोटे शिक्के तयार केल्याबद्दल सात ते दहा वर्षांपर्यंतची शिक्षा असणारे दखलपात्र गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवावेत. भ्रष्टाचारी अधिकारी, कर्मचार्‍यांच्या संपत्ती, जंगम, स्थावर मालमत्तेची चौकशी करावी. अपहारातील सहभागींची खुली चौकशी व्हावी.

गैर मार्गाने मिळवलेल्या बेहिशोबी संपत्तीचा शोध घेऊन ती तात्काळ जप्त करावी, असे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान भ्रष्टाचाराला राजकीय नेतृत्व जबाबदार असल्याचे काळे पत्रकार परिषदेत म्हणाले. यावेळी मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, शहर जिल्हा उपाध्यक्ष निजाम जहागीरदार, अलतमश जरिवाला, शहर जिल्हा सचिव शंकर आव्हाड, माथाडी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, अपंग हक्क काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष सोफियान रंगरेज, शहर जिल्हा खजिनदार मोहनराव वाखुरे आदी उपस्थित होते.

नांगरे पाटील यांच्याकडे पुरावे सादर करणार
१ डिसेंबरला अँटी करप्शनचे अप्पर पोलीस महासंचालक नांगरे पाटील यांची मुंबई येथे समक्ष भेट घेणार असून याबाबत जलद गतीने सखोल तपास करण्याची मागणी करणार असल्याचे काळे यांनी सांगितले. नाशिक परिक्षेत्र पोलीस अधीक्षक धाडगे यांच्याशी दूरध्वनीवरून बोलणे झाले असून लवकरच नाशिक कार्यालयात समक्ष हजर राहून शेकडो कागदपत्रांचे पुरावे दाखल करणार असल्याचे काळे म्हणाले.

भ्रष्टाचार दडपण्यासाठी खोटे गुन्हे
काँग्रेसने शहरातील रस्त्यांच्या प्रश्नावरून अनेक निवेदनं दिली, आंदोलने केली. मुंबईच्या आझाद मैदानावर खड्ड्यांचे प्रदर्शन भरवले. आत्मदहनाचा इशारा दिला. मनपावर आसूड मोर्चा काढला. त्यावेळी माझ्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांवर भ्रष्टाचार दडपण्यासाठी राजकीय दबावातून खोटे गुन्हे दाखल केले गेले. रस्त्याचा मलिदा खाणारे चोर मोकाट फिरत आहेत. शहराला खड्ड्यात घालणार्‍यांना तुरुंगात घातल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा इशारा यावेळी काळे यांनी दिला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र सुजित झावरे यांची पत्रकार परिषदेत माहिती शनिवारी अजित पवार...

केडगावमध्ये पुन्हा घडलं भयंकर! २७ वर्षांच्या तरुणावर सपासप वार? कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची...

दादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! ‘वेळ आल्यावर..’;विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण..

Politics News: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले...

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्कर यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...