मुंबई – माणूस मोठा झाला कि त्याला राजकारणाचे वेध लागतात. असेच काहीसे सिने अभिनेते, अभिनेत्री यांच्याबाबत घडत आहे. हेमा मालिनी, जया प्रदा, जया बच्चन, स्मृती इराणी यांच्या पाठोपाठ आता अभिनेत्री अक्षरा सिंह राजकारणात एंट्री करणार असल्याचे बोलले जात आहे.
चित्रपटांत काम करून नाव आणि पैसा मिळविणार्या अनेक कलाकारांना राजकारणाचे प्रवेशद्वार खुणावतात. चिराग पासवान, किरन खेर, हेमा मालिनी, गोविंदा, परेश रावल, मुनमुन सेन, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, आधिकारी दीपक, बाबुल सुप्रीयो, भगवंत मान, जयाप्रदा, रवी किशन, जया बच्चन, स्मृती इराणी अशा कलाकारांनी लोकसभेपर्यंत मजल मारली. यात आणखी एका अभिनेत्रीचे नाव जोडले जाणार आहे.
यामध्ये भोजपुरी चित्रपटातील अक्षरा सिंह हिने राजकारणात प्रवेश कारणाचा निर्णय घेतला आहे. अक्षरा हिने प्रशांत किशोर यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चांना अधिकच उधाण आले आहे. किशोर यांच्या जनसुराज अभियानात ती सामील झाली. आगामी लोकसभा निवडणुकीत ती जनसुराज पक्षाची उमेदवार असणार आहे. यामुळे चाहतेही विचारात पडले आहेत. अभिनेत्री अक्षरा सिंह हिने बिहारची राजधानी पाटणा येथील पक्ष कार्यालयात पक्षाचे सदस्यत्व घेतले.
काही दिवसांपूर्वी अक्षरा सिंह हिने आपण राजकारणात येणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतर काही दिवसातच अक्षराने जनसुराज अभियानाचे सदस्यत्व घेतले. आगामी काळात होणारी लोकसभा निवडणुक ती लढविणार असल्याच्या चर्चा आहेत. अक्षरा कोणत्या मतदारसंघातून लढणार हे लवकरच स्पष्ट होईल.