पारनेर | नगर सह्याद्री
देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखान्याला हात लावला तर क्रांती शुगर कारखाना बंद पाडू असा इशारा पारनेर कारखाना बचाव समितीने आज पारनेर येथील बैठकीत क्रांती शुगर पुणे या खाजगी कंपनीला दिला आहे. तर दुसरीकडे सेवानिवृत्त कामगार संघटना आक्रमक झाली असून पारनेर मध्ये यासंबंधी बैठक आयोजित करून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
पारनेरचे पुर्नजीवन होवू नये यासाठीच पारनेर कारखाना भंगारात विकण्याचा क्रांती शुगरचा डाव असल्याचा आरोप समितीचे बबनराव सालके यांनी केला. उच्च न्यायालयाचा पुढील आदेशापर्यंत जैसे थे परिस्थितीती ठेवण्याचा आदेश असतानाही पारनेरला हात लावला तर, क्रांती शुगरचा चालु गळीत हंगाम बंद पाडु असा इशारा समितीच्या वतीने दिला आहे. या संबंधीचे तहसिलदार पारनेर, पोलिस निरीक्षक साखर आयुक्त प्रादेशिक साखर सहसंचालक यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.
पारनेरच्या सेनापती बापट स्मारकात समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला कारखाना बचाव समितीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. १७ हजार सभासद असलेल्या पारनेर साखर कारखान्याची भंगारात विक्री करण्याच्या हालचाली चालु असल्याची माहिती समजताच कारखाना बचाव समिती व कामगार आक्रमक झाले आहेत. आठ वर्षांपुर्वी क्रांती शुगर या खाजगी कंपनीने गैरमार्गाने पारनेर कारखान्याचा ताबा घेतला आहे.
याबाबत निकाल होवून कारखान्याची जमीन पुन्हा पारनेरच्या नावे झालेली आहे. पुढे, क्रांती शुगरने औरंगाबाद खंडपीठात अपिल केले आहे. त्यावर निकाल होईपर्यंत तिथे, जैसे थे परिस्थितीती ठेवण्याचे आदेश न्यायालयाचे सताना क्रांती शुगरने पारनेर कारखाना मोडकळीस काढल्यामुळे कामगार व कारखाना बचाव समिती संतप्त झाली आहे. कारखान्याच्या पुर्नजीवनासाठी बचाव समिती प्रयत्नशील असुन पुर्नजीवनाचा प्रस्ताव शासनाकडे विचाराधिन आहे. त्यासाठी तालुक्यातील सुमारे ८५ ग्रामसभांचे तर, ८ सहकारी सेवा संस्थांचे ठराव बचाव समितीकडे आले आहेत.