नगर सहयाद्री टीम-
प्राचीन काळात मातीच्या भांड्यांना फार महत्व दिले जात होते. बाजारात चककणारी व रंगवलेली मातीची भांडी पाहायला मिळत होती मात्र त्याची जागा अनेक नाविन्यपूर्ण भांड्यांनी घेतली आहे. मात्र मातीच्या भांडे वापरण्याने अनेक फायदे होत असतात असे प्राचीन काळातील लोकांचे म्हणणे आहे. प्राचीन काळात मातीच्या भांड्यांना का होते महत्व? जाणून घ्या सविस्तर
प्राचीन काळात मातीच्या भांड्यांना महत्व
वास्तुशास्त्रानुसार घरात मातीची भांडी ठेवणे खूप शुभ मानले जाते आणि यामुळे घरात सकारात्मकता येते. प्राचीन काळी लोक बहुतेक मातीची भांडी ठेवत असत आणि त्यामुळे ते अधिक आनंदी असत. पूर्वीच्या काळी मातीच्या भांड्यातच अन्न शिजवून खाल्ले जात असे. मातीची भांडी घरात सकारात्मकता आणतात, तर घरात धन-समृद्धीही वाढते. यासोबतच देवी लक्ष्मीचेही घरात आगमन होते. घराच्या मंदिरात नेहमी मातीचा दिवा लावतात.
मातीच्या भांड्यांत केलेल्या स्वयंपाकाचे फायदे
मातीच्या भांड्यात डाळ आणि भाजी तयार केल्यानंतर यात 100 टक्के सूक्ष्म पोषक घटक कायम राहतात. अनपदार्थातील कॅल्शियम, फॉस्फरस , लोह, मॅग्नेशियम आदी घटक नियंत्रित ठेवण्यासाठी याची मदत होते.अन्नपदार्थांतील पीएच व्हॅल्यु नियंत्रित ठेवण्यासह अनेक आजारांपासून बचाव करण्यात ही भांडी महत्त्वाची कामगिरी बजावतात. विशेष म्हणजे, या भांड्यांत स्वयंपाक केल्याने तेल कमी लागतं. या कमी तेलाच्या स्वयंपाकाची हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी याची चांगली मदत होते.
.