पारनेर। नगर सह्याद्री-
तालुक्यातील महसूल व कृषी कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांना पिकांचे पंचनामे करताना कोणत्याही अडचणी येऊ देऊ नका, त्यांना योग्य ते सहकार्य करा. शेती पिकांच्या नुकसानीची तीव्रता खूपच भयानक असून यातून सावरण्यासाठी सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय नक्की घेईल असा दिलासा देत मदतीचा हात देणार असल्याचे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी उपस्थितांना सांगितले.
पारनेर तालुक्यातील जवळा, गांजिभोयरे, सांगवी सूर्या, पानोली आदी गावात अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीचा पाहणी दौरा खासदार विखे पाटील यांनी दि.१ डिसें रोजी केला. त्यावेळी जवळा ता पारनेर येथे कांदा, पपई ,द्राक्ष , केळी, ॲपल बोर आदी पिकांचे नुकसान झाले याबाबत प्रत्यक्ष पाहणी करत शेतकरांशी चर्चा केली.
यावेळी तालुका अध्यक्ष राहुल शिंदे. चेअरमन शिवाजीराव सालके, विशाल पठारे,माजी सभापती काशिनाथ दाते, सचिन वराळ, माजी सभापती गणेश शेळके, संदीप पाटील सालके, माजी उपसरपंच गोरख पठारे, बाबाजी लोखंडे, दत्ता नाना पवार, संपत सालके, अमोल रासकर , प्रमोद कावरे, अमोल सालके, गणेश देशमुख, दत्ता आढाव उपस्थित होते.