नगर सहयाद्री टीम-
मिनी लोकसभा म्हणून पाहिल्या जात असलेल्या पाच राज्यांपैकी चार राज्यांचे निकालजाहीर होत आहे. सुरुवातीच्या हाती आलेल्या कलानुसार मध्यप्रदेश, राजास्थान, छत्तीसगडमध्ये भाजप (BJP) आघाडीवर आहे. तीन राज्यात भाजपने पुन्हा निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.
राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चारही राज्यांचे कल हाती आले आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये या चारही राज्यात काँग्रेस आघाडीवर होती. काँग्रेसची सत्ता येईल असंच वातावरण होतं. त्यामुळे काँग्रेस कार्यालयाबाहेर जल्लोषही करण्यात येत होता. मात्र, जसजशी मतमोजणी पुढे सरकत गेली, तस तसा कल भाजपच्या दिशेने झुकू लागला आहे. या कलांनाच कलाटणी मिळाली आहे. चारपैकी तीन राज्यातील कलांमध्ये भाजप आघाडीवर आहे.
मध्यप्रदेश- २३० जागा
भाजपा -१५६
काँग्रेस-७१
ईतर -०३
राजास्थान-१९९ जागा
भाजपा -११२
काँग्रेस-७३
ईतर -१४
छत्तीसगड-९०
भाजपा -५०
काँग्रेस-४०
ईतर -००
तेलंगना ११९
बीआरएस-३९
भाजपा -०७
काँग्रेस-७०
ईतर -०३