नगर सह्याद्री टीम/जालना :
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण संदर्भात रान पेटवले. सगळीकडे आंदोलने झाली. आज ते महाराष्ट्रभर सभा घेत आहेत. त्यामुळे सध्या फेमस झाले असून लोक त्यांना अक्षरशः डोक्यावर घेत आहेत.
त्यांच्या सभेला इतकी गर्दी असते की, एखाद्या राजकीय नेत्याच्या सभेलाही एवढी गर्दी जमणार नाही. आता सध्या मनोज जरांगे पाटील हे राजकारणात येणार का? असच चर्चा सध्या रंगल्या आहेत. आता याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी याबाबत खुलासाच केला आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील
राजकारणात येण्याबाबत जारेंगे पाटील म्हणाले की, मी मुलगा म्हणून काम करतोय. नेता बनण्याची हवाच नाही. मराठा समाजाच्या नोंदी सापडत आहेत. जर मराठा आणि कुणबी एक आहे तर तुम्ही आरक्षण देऊ नका कसं म्हणता? ते (छगन भुजबळ) आम्हाला आरक्षण मिळू देत नाही, असं ओबीसींचं म्हणणं आहे. त्यामुळे धनगर बांधवांनी का साथ द्यावी त्यांना? नुसतं विरोध करायचा म्हणून करू नये, असा टोला त्यांनी लगावला.
त्यांना कशाला मेसेज द्यायचा?
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना काही मेसेज देणार आहात का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांना काय मेसेज द्यायचा? त्यांना दाखवण्यासाठी आम्ही काहीही करत नाही. ओबीसी बांधव स्वतः हून आलेत. ते आम्हाला साथ देतील मग आम्ही का देऊ नये असेही ते म्हणाले आहेत.