नगर सह्याद्री टीम-
Weather Update: महिन्यांच्या सुरवाती पासूनच अवकाळी पावसाने बहुतांश ठिकाणी धुमाकूळ घातला आहे. बंगालच्या उपसागरात सातत्याने घडत असलेल्या बदलांचा परिणाम हवामानावर पडत आहे.
मिचॉन्ग चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दोन राज्यांना मोठा तडाखा दिला आहे. या चक्रीवादळाचा परीणाम महाराष्ट्रातही पाहायला मिळत असून येत्या ४८ तासांत राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आंध्र प्रदेश किनारपट्टीवर मिचॉन्ग नावाचं चक्रीवादळ येऊन धडकलं आहे. या चक्रीवादळामुळे आज विदर्भातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामान विभगाच्या माहितीनुसार, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गुरुवार आणि शुक्रवारी अवकाळी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात विजांसह पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे.