नगर सह्याद्री / पुणे :
राष्ट्रीय तपास संस्थेने देशभरातविविध खाणी छापे टाकले आहेत. इसिस मॉड्यूल उद्ध्वस्त करण्यासाठी ही कारवाई केली आहे. पुणे शहरासह मुंबई, ठाणे ग्रामीणमध्ये छापे टाकले असून या छापेमारीत १५ खतरनाक दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. धक्कादायक म्हणजे या अतिरेक्यांकडून बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पकडलेल्या दहशतवाद्यांजवळ द्रव्य स्वरूपात बॉम्ब स्फोट करणारे साहित्य मिळाल्याने खळबळ उडाली आहे.
पुण्यात दुचाकी चोर पकडले व समोर आली धक्कादायक माहिती
इसिस मॉड्यूल हे प्रकरणच पुण्यातून उघड झाले आहे. एका मोटारसायकल चोरी प्रकरणाचा पुणे पोलीस शोध घेत होते. यात त्यांनी दोघांना ताब्यात घेतले. महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी यांना पकडले.
त्यावेळी त्यांचा तिसरा साथीदार शाहनवाज उर्फ शैफी उज्जमा फरार झाला. पोलिसांनी त्यांच्या घराची तपासणी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली होती. मिळाली. दहशतवादी कारवायांसाठी असणारी आक्षेपार्ह कागदपत्रे, बॉम्ब बनवण्याचे साहित्य मिळाले. त्यानंतर मोटारसायकल चोरी प्रकरणातील हे आरोपी दहशतवादी असल्याचे स्पष्ट झाले.
काय होता उद्देश
इसिसच्या नेटवर्कमध्ये हे पुण्यातील अतिरेकी सहभागी झाले होते. भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याचे उद्दीष्ट इसिसने त्यांना दिले होते. त्यासाठी युवकांचा शोध घेऊन त्यांचे ब्रेन वॉश करण्याचे काम हे करत होते. मागील महिन्यात एका अतिरेक्यास अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीतून देशाच्या सैनिक स्थळांवर हल्ल्याची योजना या अतिरेक्यांनी आखल्याची माहिती मिळाली.