पिंपळगाव रोठा। नगर सहयाद्री-
लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा ता. पारनेर जि. अहमदनगर या तीर्थक्षेत्रावर पुढील वर्षापासून चंपाषष्टी उत्सवाला जोडून, हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजनाची परंपरा कायम ठेवणेसाठी आणि देवस्थानवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी, ग्रामस्थ, भाविकभक्त, पंगत अन्नदाते यांनी आता नियोजन करण्याचे ठरविले आहे.
यावर्षी शनिवार दि.९ डिसेंबरला देवस्थानजवळ हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन देवस्थान विश्वस्त मंडळाने आर्थिक कारण देऊन वंद केल्याने ग्रामस्थ, पंगत-अन्नदाते, सेवाभक्ती करणारे ग्रामस्थ भक्तांमध्ये मोठी नाराजी झाली आहे. सर्वाना कीर्तन सप्ताहाचे माध्यमातून देवाच्या चरणी होणा-या भक्ती हरिनामापासून वंचित रहावे लागले असल्याची नाराजी पसरली आहे.
चंपाषष्टीला जोडून चालत आलेली कीर्तन सप्ताहाची परंपरा कायम ठेवणेसाठी पुढील वर्षापासून ग्रामस्थांतर्फे देववस्थानजवळ हरिनाम कीर्तन सप्ताह आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे देवस्थानचा आर्थिक भार कमी होईल आणि लोकसहभागतून सप्ताहाची अखंड परंपरा राहील.
चंपाषष्टी हा मार्तंड भैरव अवतार दिवस असून पडू नवरात्र उत्सवाने चंपाषष्टी उत्सव साजरा होतो. या पर्व काळात चालत आलेला कीर्तन सप्ताह नवीन विश्वस्त मंडळाने यावर्षी बंद केल्याने ग्रामस्थ, भक्त, पंगत अन्नदाते यांचेमध्ये प्रचंड नाराजी आहे. गेली बारा वर्ष दरवर्षी चंपाषष्टीच्या आगोदर काही दिवसांपासूनच कीर्तन सप्ताहाची चाहूल व उत्सुकता सर्वाना लागते. परंतू यावर्षी सप्ताह प्रारंभ होण्याचा दिवस कर्तिक कृ १२ उजडला तरी नियोजन नसल्याचे पाहून ग्रामस्थ नाराजी व्यक्त करीत आहेत.
चंपाषष्टीच्या आगोदर सुरू होणा-या कीर्तन सप्तहापासूनच मंदिर परिसरातील विद्युत रोषणाई व भक्तीमय वातावरणात यावर्षी खंड पडला असून सर्वत्र सुनेसुने वाटत आहे. दरवर्षी चंपाषष्टी उत्सवात होणारा धार्मिक सतसंग व संतदर्शन सोहळा हा कार्यक्रम १८ तारखेच्या चंपाषष्टी उत्सवात नमूद नसल्याने भाविकभक्तांमध्ये नाराजी असून त्याचा परिणाम उत्सवावरती होण्याची शयता आहे.
या प्रसिद्धी पत्रकावर गोपीनाथ घुले, दिनेश डावखर, बाबाजी जगताप, बबन गायकवाड, बबन पुंडे, योगशे पुंडे, किसन मुंढे, शिवाजी ढोमे, मालोजी जगताप, रामचंद्र घुले, दिगंबर जगताप, सुदाम पुंडे, शहाजी शिंदे आदींच्या सह्या आहेत.