spot_img
अहमदनगर'काही लोकांच्या मेंदूची तपासणी करण्याची गरज, वेळ पडल्यास तेही करू' ; खा....

‘काही लोकांच्या मेंदूची तपासणी करण्याची गरज, वेळ पडल्यास तेही करू’ ; खा. सुजय विखेंचा पुन्हा घणाघात,,पहा

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री :
अनेकदा अहमदनगर महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत होते, पण या उलट आता सर्वसामान्यांचा पुढाकार घेऊन सर्वसामान्यांसाठी एम.आर.आय. सेंटरची उभारणी महापालिकेच्या माध्यमातून झाली आहे. महापालिकेचा कारभार आता सुधारत असल्याचे मत खा. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.

अहमदनगर महापालिका आणि पुणे येथील लोकमान्य हॉस्पिटल मेडिकल स्टोअर्स यांच्या माध्यमातून प्रोफेसर कॉलनी चौक येथील सावित्रीबाई फुले व्यापारी संकुल येथे एम.आर.आय. सेंटरचा प्रारंभ अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, महापौर रोहिणी शेंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी विखे म्हणाले, पुढील सहा महिन्यात गोरगरिबांसाठी ५०० ते ६०० रुपयात सीटी स्कॅनची सुरुवात करणार आहोत. माझ्या व आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून पालकमंत्री यांना विनंती करुन जिल्हा नियोजन मधून आरोग्य विभागासाठी निधी वर्ग करू व गोरगरीबांना परवडेल असे काम करत राहू.

यावेळी बोलताना खासदार सुजय विखे पाटील यांनी पुन्हा एकदा जोरदार बॅटिंग करत विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला आहे. मी जेव्हापासून खासदार म्हणून निवडून आलो तेव्हापासून दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करत आलेलो आहे आणि आता आमदार संग्राम जगताप व माझ्या माध्यमातून नगर शहराला भरघोस निधी आलेला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात नगरकर म्हणतील की नगर बदलले आहे,

एवढे विकासकामे सुरू आहेत आणि सुरू होणार आहेत. मात्र काही लोकांच्या मेंदूची तपासणी करण्याची गरज असून त्यांची मेंदूची तपासणी मी नक्कीच करेल असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे. तर महानगरपालिकेच्या नगरसेवकांना त्यांनी यावेळी विनंती केली की सर्वात स्वस्त असे एम.आर.आय. सेंटर हे अहमदनगर मध्ये महापालिकेच्या माध्यमातून सुरू झाले असल्यामुळे नगरसेवकांनी शिफारस चिठ्ठ्या पाठवू नयेत, अशी विनंती करून माझे ही स्वतःचे सेंटर आहे त्या ठिकाणी तुम्ही या तिथे मोफत करून देतो. मात्र हे सेंटर चालवण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

खा. विखे म्हणाले, महापालिकेच्या बंद अवस्थते ज्या काही इमारती आहेत त्यांचा वापर गोरगरिबांसाठी करता येईल व रुग्णांसाठी देखील त्या वापरता येतील. पुढील एक वर्षांत शहराच्या विकासासाठी सुमारे १० कोटी खर्च करून कॅथ लॅबची उभारणी होणार आहे. त्याला मंजुरी सुद्धा मिळाली असून जानेवारी महिन्यात काम सुरू होईल असे खा. विखे यांनी सांगितले.

तसेच आरोग्य सेविकांनी कोरोना काळात उल्लेखनीय काम केले आहे. मी आरोग्य सेविकांच्या पाठीशी सदैव आहे व संकटकाळात देखील त्यांच्या पाठीशी उभा राहील असे देखील मत खा. विखे यांनी मांडले.

यासोबतच आमदार व सर्वपक्षीय नगरसेवक यांच्या सर्वांच्या सहकार्यातून समाज कल्याण भवन समोरील ४० गुंठे जागेमध्ये अत्याधुनिक एअर कंडीशन ग्रंथालयाची उभारणी देखील होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

याप्रसंगी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, भैया गंधे, आशाताई कराळे, सोनुबाई शिंदे, मनोज दुल्लम, अजय इंगळे, दत्ताभाऊ गाडळकर, निखिल वारे, रविंद्र बारास्कर, पल्लवी जाधव, नितीन शेलार, वंदना ताठे, सचिन जगताप, पुष्पाताई बोरुडे, विनीत पाऊलबुद्धे, बाळासाहेब पवार, अजिंक्य बोरकर, माणिकराव विधाते, तुषार पोठे, शारदाताई ढवण, श्रामदास आंधळे, सुनील त्र्यंबके, संपत्त नलावडे, बाबुशेठ टायरवाले तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासोबतच माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, यांच्यासह भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदे गट, काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि आजी व माजी नगरसेवक उपस्थित होते.

 

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र सुजित झावरे यांची पत्रकार परिषदेत माहिती शनिवारी अजित पवार...

केडगावमध्ये पुन्हा घडलं भयंकर! २७ वर्षांच्या तरुणावर सपासप वार? कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची...

दादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! ‘वेळ आल्यावर..’;विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण..

Politics News: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले...

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्कर यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...