नेवासा । नगर सहयाद्री
नेवासा तालुक्यातील प्रवीण सुधाकर डहाळे हत्याकांड प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात पसार असलेला शरद कुंडलिक ढोकणे याला (एलसीबी) पोलिस पथकाने अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद संभाजी कापसे यांच्या फिर्यादीवरून 27 ऑक्टोबर रोजी शेखर अशोक सतकर, माऊली उर्फ अरूण दत्तात्रय गणगे, अशोक उर्फ खंडु किसन सतकर (सर्व रा. सुरेगाव, ता. नेवासा), दीपक सावंत (पुर्ण नाव माहित नाही, रा. नगर), ईश्वर पठारे (रा. वरखेड, ता. नेवासा), जालींदर बिरूटे (रा. वरखेड) व इतर दोन ते तीन अनोळखी इसमांनी प्रवीण डहाळे याला मागील भांडणाच्या कारणावरून मारहाण करत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चार जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या चौकशीत शरद ढोकणे याचे नाव समोर आले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने एलसीबीचे पथक ढोकणेचा शोध घेत होते. दरम्यान निरीक्षक पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शरद ढोकणे हा माळीचिंचोरा या ठिकाणी येणार आहे. पोलीस निरीक्षक आहेर यांच्या मार्गर्दर्शनाखाली एलसीबीच्या पथकाने सापळा लावून शरद ढोकणे याला अटक केली आहे.