अहमदनगर। नगर सहयाद्री-
Ahmednagar : हवामानातील बदलांचा परिणाम आता लोकांच्या आरोग्यावरही होत आहे. या बदलामुळे नगर जिल्हा सध्या हंगामी आजारांच्या विळख्यात आहे. जिल्हा रुग्णालयात रांगा लागल्या असल्याची परिस्थिती आहे.
बहुतांश रुग्ण साथीच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यामुळे लोक प्रचंड चिंतेत आहेत. सुदैवाची बाब रुग्णालयात रुग्णांना योग्य वैद्यकीय सेवा व उपचार दिले जात आहेत. अनेक नागरिक आजारांच्या विळख्यात आहेत.
विषाणूजन्य ताप, घसादुखी, खोकला आणि सर्दी, डेंग्यू आणि मलेरिया हे हंगामी आजारांमध्ये प्रमुख आहेत. बहुतांश रुग्ण हे विषाणूजन्य तापाचे आहेत.
काल बुधवार दि. १३ रोजी नगरच्या जिल्हा रुग्णालयात तपासणी व उपचारासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दिवसभरात सातशे पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करत उपचार करण्यात आले.
वातावरण बदलामुळे संसर्गजन्य आजारात वाढ झाली आहे. सकाळपासूनच अनेकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या दिशेने तपासणीसाठी धाव घेतली होती.