संगमनेर। नगर सहयाद्री
प्रत्येक तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. अनके वर्षात या शहरात साधं स्मारक देखील उभे राहू शकलं नाही. ज्यांच्या दिव्याखाली अंधार आहे त्यांनी आम्हाला शिकवू नये. आता तर त्यांच्या बॅनरवरून सोनिया व राहुल गांधी अचानक गायब झाले आहे. कोण कुठल्या दिशेने चालले हे समजत नाही, आमच्या पक्षाकडे तर हाउसफुल झालंय. अशा शब्दात महसूल मंत्री विखे पाटील यांनी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडलं.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या संगमनेर शहरात काल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थित विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात नेहमीच आरोप प्रत्यारोप सुरू असतात.
राधाकृष्ण विखे पाटील नेमकं काय म्हणाले?
प्रत्येक तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक वर्षात या शहरात साधं स्मारक देखील उभे राहू शकलं नाही. ज्यांच्या दिव्याखाली अंधार आहे त्यांनी आम्हाला शिकवू नये. भाचे ( सत्यजित तांबे) यांना नाशिक पदवीधर संघात उभे करत काँग्रेसच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडून आणलं. हे सगळ चालत अंधारात.
तुमचा महाविकास आघाडीचा उमेदवार होता ना. त्यावेळी तुम्ही हात बांधले होते, तोंड नव्हतं बांधला ना? आमच्यावर पक्ष बदलण्याची टीका करतात. अत्ता तर लागणाऱ्या बॅनर वरून अचानक सोनिया व राहुल गांधी देखील गायब झाल्याचे दिसत आहे. कोण कुठल्या दिशेने चालले हे समजत नाही, आमच्या पक्षाकडे तर हाउसफुल झालंय. असे महसूल मंत्री विखे पाटील म्हणाले.