spot_img
ब्रेकिंगNagar Urban Bank Case: व्यवसायाकरिता कर्जे, भलतीकडेच खर्च! २९१ कोटींचा अपहार? 'यांना'...

Nagar Urban Bank Case: व्यवसायाकरिता कर्जे, भलतीकडेच खर्च! २९१ कोटींचा अपहार? ‘यांना’ वाढली पोलीस कोठडी

spot_img

Nagar Urban Bank Case:नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या तत्कालीन सहाय्यक मुख्य व्यवस्थापक मनोज वसंतलाल फिरोदिया व प्रविण सुरेश लहारे या दोघांना न्यायालयाने १ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. फिरोदिया, लहारे यांच्यावर गंभीर आरोप

फिरोदिया याने कुवत नसतानाही तारण मालमत्तांचे वाढीव मूल्यांकन अहवाल घेऊन त्यांना कमाल मर्यादेचे कर्ज मंजूर करण्याची शिफारस केली. तसेच, लहारे याने तीन कोटींचे कर्ज घेऊन ती रक्कम आरोपी मनोज वसुलाल मोतियानी याच्या खात्यात वर्ग केल्याचे व त्यातून जागा खरेदी झाल्याचा दावा आर्थिक गुन्हे शाखेने केला आहे. कर्ज घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी फिरोदिया व लहारे यांना अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले.

यावेळी सरकारी वकील मंगेश दिवाणे यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली. आरोपी फिरोदिया याने संचालक मंडळ, अधिकारी, कर्जदार व इतर आरोपीशी संगनमत करून गुन्हा केला आहे. यात २९१ कोटींचा अपहार झाला आहे. फिरोदिया कर्ज अर्ज छाननी विभागात सहायक प्रमुख व्यवस्थापक पदावर काम करत असताना त्याने कर्जदारांची कुवत नसताना, कर्जाकरीता तारण मालमत्तांचे वाढीव दराचे मूल्यांकन अहवाल घेऊन त्यांना कर्ज मंजूर करण्याची शिफारस केली आहे. अपहार कालावधीत फिरोदिया याच्या बँक खात्यात मोठ्या प्रमाणात रोख रकमा जमा करण्यात आल्या आहेत. याबाबत त्याच्याकडे तपास करायचा आहे.

आरोपी लहारे याने त्याच्या नावे बँकेत व्यवसायाकरीता ३ कोटी रुपये कर्ज घेतले. ही पूर्ण कर्ज रक्कम गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी मनोज वासुमल मोतीयानी याच्या बँक खात्यात वर्ग केली. या कर्ज रकमेतून मोतीयानी याने खरेदी केलेली मालमत्ता या कर्जास तारण ठेवल्याचे समोर आले आहे. तसेच कोणतीही मालमत्ता तारण न घेता कर्ज मंजूर केले व आरोपी मोतीयानी याने खरेदी केलेली मालमत्ता ही नंतर तारण ठेवण्यात आली. याच्या तपासासाठी दहा दिवस पोलिस कोठडी मिळावी, असा युक्तिवाद अ‍ॅड. दिवाणे व तपासी अधिकार्‍यांनी केला. तो ग्राह्य धरून न्यायालयाने दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र सुजित झावरे यांची पत्रकार परिषदेत माहिती शनिवारी अजित पवार...

केडगावमध्ये पुन्हा घडलं भयंकर! २७ वर्षांच्या तरुणावर सपासप वार? कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची...

दादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! ‘वेळ आल्यावर..’;विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण..

Politics News: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले...

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्कर यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...