spot_img
अहमदनगरबारस्कर खंडणी बहाद्दर, बलात्काराचे प्रकरण दाबले म्हणून...; जरांगे यांचे गंभीर आरोप

बारस्कर खंडणी बहाद्दर, बलात्काराचे प्रकरण दाबले म्हणून…; जरांगे यांचे गंभीर आरोप

spot_img

अहमदनगर / नगर सहयाद्री : अजय महाराज बारसकर यांच्यावर खंडणीचे गंभीर आरोप झालेले आहेत. खंड्या उर्फ अजय बारसकर हा सुरवातीला खाकी कपडे घालून गाड्या लुटण्याचे काम करत होता. तसेच एका लहान मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे आणि भिशी चालवण्याचे काम करत असताना भिशीचे पैसे घेऊन पळून गेला होत असा आरोप अहमदनगर मराठा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

अहमदनगर मराठा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत अजय बारसकर यांनी जे मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केले ते फेटाळून लावत बारसकर यांचा चांगलाच समाचार घेतला. ऍड.गजेंद्र दांगट, नीलेश सुंबे, विशाल घोलप आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी मराठा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मराठा समाज मनोज जरांगे यांच्यामागे उभा राहणार असल्याचे व पुढील ठरलेल्या आंदोलनाच्या दिशेत सहभागी असल्याचे जाहीर केले.

मराठा समाजाचे जेव्हापासून आंदोलन सुरू झाले तेव्हापासूनच त्यांनी वेगळी भूमिका घेतल्याने दोन महिन्यापूर्वीच अहमदनगरच्या मराठा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी अजय बारसकर यांना बाहेर काढले होते असे संगत कोणतेही उत्पन्नाचे साधन नसताना जमिनी घेतल्या त्याचा पैसा कसा आला याची चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मागील आठवड्यात खंडू उर्फ अजय बारस्कर हा कोणत्या तरी मोठ्या नेत्यांच्या बरोबर हवाई सफर करून आला आणि त्यानंतर त्याने बोलायला सुरुवात केली. मराठा आंदोलन थांबवण्यात सरकारला अपयश आल्याने फूट पाडून आंदोलन भरकटवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप या वेळी पत्रकार परिषदेत करण्यात आला.

मनोज जरांगे यांच्यामागे शरद पवार: वानखेडे
मराठा आंदोलनात मनोज जरांगे यांच्यासोबत काम करणार्‍या संगीता वानखेडे यांनी मनोज जरांगे यांच्यावर घणाघाती हल्ला चढवली. त्या म्हणाले, मनोज जरांगे भोळा भाबडा माणूस, मूळ भाषा शैलीत बोलणारा माणूस म्हणून मी आधी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. मनोज जरांगे यांची बाजू घेऊन मी छगन भुजबळ यांना ट्रोल केले. परंतु मला खरे समजल्यावर गेल्या १ ते १.५ महिन्यांपासून मी विरोध करत आहेत. मनोज जरांगे कोणाला विश्वासात घेत नव्हते. त्यांना शरद पवार यांचाही फोन येत होता. शरद पवार जसे सांगतात तसेच मनोज जरांगे करतात. पुणे शहरात मनोज जरांगे यांचे बॅनर ज्यांनी लावले ते राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी यांनी लावले होते. महाराष्ट्राला त्यांनी वेड बनवले आहे.

मनोज जरांगेंचे १०० अपराध आता भरले : बारस्कर
शिशूपालाप्रमाणे जरांगेंचेही १०० अपराध आता भरले आहेत. जरांगे यांनी २३ डिसेंबर रोजी गुप्त बैठक कन्हैया हॉटेलमध्ये घेतली. त्या बैठकीचा मी साक्षीदार आहे. तिथे जरांगे बैठकीत एक बोलले आणि बाहेर माध्यमांसमोर दुसरेच बोलले. मी योग्यवेळी ते जाहीर करेन, असे म्हणत बारस्कर यांनी जरांगेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच, मुंबईला मोर्चा निघाला असताना रांजणगाव गणपती येथे पहाटे चार वाजता जरांगे यांची एका उच्चपदस्थ अधिकार्‍यांबरोबर बैठक झाली. या अधिकार्‍याने या बैठकीचे रेकॉर्डिंग केले आहे. ते लवकरच निवृत्त होतील आणि जरांगेंचे बिंग फुटेल, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

प्रहारमधून हकालपट्टी
बारस्कर हे बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे पदाधिकारी होते. प्रहारने पत्रक काढत म्हणाले की, सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सुचित करण्यात येते की, प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांचा आदेश आहे की, पक्षामध्ये कोणीही मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या मराठा आरक्षणाविषयी किंवा इतर आरक्षण किंवा नेत्यांबद्दल कोणतीही भूमिका मांडू नये. असे केल्यास त्या व्यक्तीचा प्रहार जनशक्ती पक्षाशी काहीही संबध राहणार नाही. पक्षाची अधिकृत भूमिका पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू हेच स्वतः मांडतील. इतर कोणीही अध्यक्षांच्या मान्यतेशिवाय आपली भूमिका मांडू नये. आज दि. २१ फेब्रुवारी २०२४ रोजी अजय महाराज बारस्कर यांनी जी भूमिका मनोज जरांगे पाटील यांचेविषयी मांडली त्या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्ष किंवा प्रहार वारकरी संघटना समर्थन करत नाही किंवा काहीही संबध नाही. तरी अजय महाराज बारस्कर यांना प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार वारकरी संघटनेमधून बडतर्फ करण्यात येत आहे. त्यांचा पक्षाशी आजपासून काहीही संबध राहणार नाही, असं या पत्रकात म्हटले आहे.

बारस्करचे बलात्काराचे प्रकरण सरकारने दाबले

जालना-मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अजय बारसकर महाराज यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अजय बारस्कर हा महाराज वगैरे नाही. त्याच्या गावातील लोक बारस्कर याने महिलांवर बलात्कार केल्याचे सांगतात. एका बलात्काराच्या प्रकरणात तो अडकला होता, ते प्रकरण सरकारकडून दाबले गेल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे.
आता हेच प्रकरण काढत बारस्कर याला माझ्याविरोधात बोलण्याची धमकी दिली गेली आहे. तू जरांगेंविरोधात बोल नाहीतर तुझं प्रकरण उघड करु, अशी धमकी दिली गेल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे.

अंतरवाली येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते. अजय बारस्कर बच्चू कडू यांच्यासोबत यायचा. त्याला विकत घेतले गेले आहे. अनेक भानगडी केल्या आहेत. त्याने एका संस्थानाच्या नावाखाली लोकांकडून ३०० कोटी जमा केले होते. दुसर्‍या गावात भिशीचे पैसे घेऊन तो पळाला होता. आता तो मरणार आहे. फक्त त्याला तुकाराम महाराजांचे नावाखाली सहानुभूती घेऊन मरायचे आहे, असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला आहे.

मी उपोषणाला बसलो होतो तेव्हा मी माझ्या तंद्रीत होतो. तेव्हा चिडचिड होत होती, त्यात मी काही बोलून गेलो असेन तर तुकाराम महाराजांसमोर नाक घासायला तयार आहे. आंदोलन संपल्यानंतर त्याचा पश्चाताप करेन. सरकार, शिंदे साहेबांचा प्रवक्ता आणि बारस्करच्या पाठी जो कोणी बडा नेता आहे, त्याने बारस्करची साथ दिली तर तुमच्या पक्षाचे वाटोळे होईल, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र सुजित झावरे यांची पत्रकार परिषदेत माहिती शनिवारी अजित पवार...

केडगावमध्ये पुन्हा घडलं भयंकर! २७ वर्षांच्या तरुणावर सपासप वार? कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची...

दादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! ‘वेळ आल्यावर..’;विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण..

Politics News: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले...

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्कर यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...