spot_img
महाराष्ट्रश्रीमंत शाहू महाराज निवडणूक लढविणार? शरद पवार यांच्या 'त्या' प्रश्नामुळे संभ्रम

श्रीमंत शाहू महाराज निवडणूक लढविणार? शरद पवार यांच्या ‘त्या’ प्रश्नामुळे संभ्रम

spot_img

कोल्हापूर। नगर सहयाद्री-
लोकसभा उमेदवार निश्चितीसाठी दौरा असा प्रचार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या कोल्हापूर भेटीपूर्वी करण्यात आला होता. दिवसभराच्या चर्चा, बैठका, कार्यक्रम होऊनही महाविकास आघाडीतील उमेदवारीची अनिश्चितता कायम आहे. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी मिळण्याची शयता या दौर्‍याने वाढली असली तरी ‘शाहू महाराज निवडणूक लढविणार, हे पहिल्यांदा ऐकतो आहे,’ असे वक्तव्य करून पवार यांनी संभ्रम निर्माण केला आहे.

जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांबाबत केवळ चर्चा होत आहे. अनेक नावे पुढे येत असली तरी कोणत्याही नावावर एकमत होताना दिसत नाही. कोल्हापूरसाठी गोकुळचे संचालक, थायलंडचे आर्थिक सल्लागार डॉ. चेतन नरके, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांनी तयारी केली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील हे शाहू महाराजांसाठी आग्रही दिसतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनीही पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढवू असे सांगितले आहे. ठाकरे सेनेकडून संजय पवार, विजय देवणे, संजय घाटगे ही नावे चर्चेत आहेत. तथापि, आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांना अजूनही तगड्या उमेवाराचा शोध सुरू आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार कोल्हापूर शहरात येताच त्यांनी श्रीमंत शाहू महाराज यांची भेट घेतली. बंद दाराआड तासभर चर्चा झाल्यानंतरही उमेदवारीबाबत संशयाचे धुके कायम राहिले. प्रसार माध्यमांनी त्यांना शाहू महाराज उमेदवार असणार का, अशी विचारणा केली असता पवार यांनी सुरुवातीलाच मी कोल्हापुरात इतके वेळ येतो पण ते निवडणूक लढवणार आहेत, असे पहिल्यांदाच समजले आहे, असे म्हणत त्यांच्या उमेदवारीबाबत कानावर हात ठेवणे आश्चर्यकारक होते. हा निर्णय माझा एकट्याचा नाही. महाविकास आघाडी याबाबत निर्णय घेईल. तरीही ते उमेदवार असतील तर मला आनंदच होईल, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. प्रत्यक्षात शाहू महाराजांना निवडणुकीत कितपत रस आहे, मविआच्या कोणत्याही पक्षाकडून चिन्हावर लढण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांना निमंत्रित केले असताना ते आघाडीकडून की ‘स्वराज्य’कडून रिंगणात उतरणार असा संभ्रम आहे.

कोल्हापुरातील कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मारकाचे लोकार्पण शरद पवार यांच्या हस्ते झाले. भाकपचे राष्ट्रीय महासचिव माजी खासदार डी. राजा, बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीची उमेदवारी दिली जाणार का, अशी विचारणा केली. याबाबत चर्चा सुरू आहे. ते आघाडीचे उमेदवार असतील असे थोरात यांनी सांगितले. याचवेळी इकडे शेट्टी यांनी शरद पवार यांच्या दौर्‍या दिवशी आपण स्वतंत्रपणे लढणार असल्याचे सांगून टाकले. स्वाभिमानी पक्षाचे नेते प्रा. जालिंदर पाटील यांनी राज्यात आठ लोकसभा मतदारसंघात पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करून त्यांनी संभ्रम वाढविला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र सुजित झावरे यांची पत्रकार परिषदेत माहिती शनिवारी अजित पवार...

केडगावमध्ये पुन्हा घडलं भयंकर! २७ वर्षांच्या तरुणावर सपासप वार? कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची...

दादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! ‘वेळ आल्यावर..’;विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण..

Politics News: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले...

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्कर यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...