अहमदनगर | नगर सह्याद्री
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार केडगाव वेस, भिंगार व एमआयडीसी येथे आदर्श रस्ता रोको आंदोलन करण्यात आला.
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना वाशीच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द व पत्रात दिलेल्या आदेशानुसार सरकारने लवकरात लवकर अमंलबजावणी करण्यात यावी. सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मराठा बांधवांनी भिंगार, केडगाव वेस, एमआयडीसी येथे रस्तारोको आंदोलन करण्यात आले. अध्यादेश पारीत होत नाही तोपर्यंत विविध स्वरुपाचे आंदोलन होणार आहे. रस्तारोको आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
भिंगार येथील आंदोलनात संपत बेरड, शामराव वाघस्कर, राजेश काळे, कैलास वाघस्कर, दीपक लिपाने,गणेश बेरड, अरुण चव्हाण, अंकुश शिंदे, नवनाथ मोरे, पंकज चव्हाण, नवनाथ कापसे, गणेश सातकर, मच्छिंद्र बेरड, रोहित बावारे, संजय सपकाळ, रमेश कडूस पाटील, सुरेश बेरड, कल्याण पवने, विलास तोडमल, डॉ. रामदास केदार, ईश्वर गपाट, कैलास काटे, संतोष बोबडे, चेतन सपकाळ, सुरज बोबडे, नंदू कवडे, रमेश कराळे, गणेश वागस्कर, अमोल वागस्कर, अरुण तनपुरे, बाळासाहेब राठोड, विलास शिंदे, राजेंद्र कडूस, नितीन हापसे, सागर शंकर मिसाळ, गोरख चव्हाण, राजेंद्र घोगरे, श्रीकांत क्षीरसागर, योगेश साळुंखे, ईश्वर बेरड, संग्राम जगताप, संजय कापसे, रोहित चव्हाण, सचिन क्षिरसागर, सोमनाथ मोरे, अविष्कार बोठे, सुरज मिसाळ, अक्षय तोडमल, महेश वाघस्कर, गणेश शिंदे आदी मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होेते.
रविवारपासून रास्तारोको नाही; मनोज जरांगे
राज्यात जिथे जिथे शय आहे तिथे मराठा आंदोलकांनी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेनंतर आंदोलन करू नका. उद्यापासून रास्तारोको होणार नाहीत. त्यानंतर धरणे आंदोलन होतील. प्रत्येक गावात, शहरात धरणे आंदोलन करायचे आहे, असे आवाहन मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी केले. मोठे आंदोलन करुनही सरकार दुर्लक्ष करत आहे. उद्यापासून रास्तारोको होणार नाही. रविवारी एक महत्त्वाची बैठक होणार आहे. मला समाज बांधवांशी महत्त्वाचे बोलायचे आहे. त्यामुळे ज्यांना शय आहे त्यांनी आंतरवाली सराटीमध्ये यावे. शयतो यावच, कारण उद्या मी निर्णायक भूमिका घेणार आहे.आपल्याच समाजातील विद्यार्थ्यांना त्रास होणार आहे. त्यामुळे थोडा आंदोलनात बदल केला आहे. आजच्या दिवशीच फक्त रास्तारोको होईल. त्यानंतर केवळ धरणे आंदोलन होईल.