अहमदनगर / नगर सह्याद्री : पुणे बस स्थानकावर चोरी करणारा चोरटा कोतवाली पोलिसांनी ठाणे जिल्ह्यातून वाद्रापाडा, अंबरनाथ वेस्ट येथून ताब्यात घेतले. अभिषेक चंदन गागडे (वय 20 वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीतील मुद्देमालही जप्त केला.
४ फेब्रुवारीला शोभा सतीश मंडलेचा (रा. स्पाईन रोड, आळंदी) या पतीसोबत अहमदनगरमध्ये एका मंगल कार्यालयात लग्नासाठी आल्या होत्या. पुन्हा माघारी परतत असताना त्यांच्या पतीसह त्या पुणे बसस्थानकावर आल्या असता बसमध्ये चढताना चोरट्याने त्यांच्या हातातील सोन्याची पाटली चोरून नेली. याबाबत त्यांनी कोतवालीत गुन्हा दाखल केला होता.
याचा तपस करत असताना पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना ही चोरी वरील आरोपीने केल्याची माहिती मिळाली. दराडे यांनी तपासी अंमलदार पोहेका शेख यांना याबाबत माहिती देऊन पथक वरील ठिकाणी पाठवले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदनगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, सपोनिरी योगीता कोकाटे, पोउपनिरी प्रविण पाटील, पो.हे.कॉ. तनवीर शेख, शाहीद शेख, पो.ना. अविनाश वाकचौरे, मपोना संगीता बडे, पो.कॉ. दीपक रोहोकले, सत्यजित शिंदे, तानाजी पवार, प्रमोद लहारे, अतुल काजळे, सुरज कदम, सोमनाथ केकान, शिवाजी मोरे, महेश पवार, अभय कदम, अमोल गाडे, याकुब सय्यद, मोबाईल सेलचे राहुल गुंडु आदींच्या पथकाने केली.