Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची बैठक पार पडली. या बैठकीत अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची चर्चा असून भाजप ३४ जागा लढवणार असल्याचे समोर आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह स्वत: महाराष्ट्रात आले होते. अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असतांना त्यांच्या प्रमुख ऊपस्थितीत महत्त्वाच्या बैठका पार पडल्या आहे. बैठकीमध्ये अमित शाह यांनी काही खासदारांना संधी देता येणार नाही. त्यांचं भविष्यात पुनर्वसन केलं जाईल, असे सांगितल्यामुळे काही खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळण्यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.
‘या’ उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल, भागवत कराड, नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील, रावसाहेब दानवे, मनोज कोटक, संजयकाका पाटील, रणजितसिंह निंबाळकर, उन्मेश पाटील यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते.
नव्या उमेदवाराच्या नावांची चर्चा?
याशिवाय, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, आशिष शेलार, राम शिंदे, अतुल सावे, बसवराज पाटील, राहुल नार्वेकर या नव्या नावांची चर्चा झाल्याचे समजते.
‘यांच्या’ उमेदवारी बाबत प्रश्नचिन्ह?
गोपाळ शेट्टी, पूनम महाजन, प्रीतम मुंडे, सुभाष भांबरे, हिना गावीत, सिद्धेश्वर महाराज यांना पुन्हा संधी मिळण्यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.