spot_img
अहमदनगरआमदार लंके अजित दादांच्या भेटीला, अजित पवार अहमदनगरच्या जागेसाठी दिल्लीत आग्रही

आमदार लंके अजित दादांच्या भेटीला, अजित पवार अहमदनगरच्या जागेसाठी दिल्लीत आग्रही

spot_img

शरद झावरे | नगर सह्याद्री
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी दंड थोपटले असून यांच्यात काटे की टक्कर होणार आहे. परंतू सध्या राज्यामध्ये शिवसेना (शिंदे गट) भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची महायुती असल्याने मित्रपक्ष भाजपाच्या वाट्याला असलेला हा अहमदनगर लोकसभा मतदारसंघ आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही असल्याची माहिती समजली आहे.

त्यामुळे याबाबत अधिक चर्चा व विचारविनिमय करण्यासाठी आमदार नीलेश लंके यांनी बुधवारी थेट देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन जवळपास अर्धा तास लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा केली आहे. त्यामुळे भाजपाच्या वाट्याला असलेला हा अहमदनगर लोकसभा मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्ली दरबारी विशेष प्रयत्न व हालचाली सुरु असल्याची माहिती समजली आहे. त्यामुळे भाजपासह मित्रपक्ष याबाबत काय निर्णय अथवा भुमिका घेतात याकडेही लक्ष लागले आहे.

राज्यातील महायुतीचा फॉर्म्युला जवळपास अंतिम झाला असून दिल्लीत अंतिम निर्णय होणार असून दरम्यान बुधवारी भाजपच्या जाहीर होणार्‍या उमेदवारांच्या दुसर्‍या यादीत महाराष्ट्रातील १२ ते १५ संभाव्य उमेदवार घोषित होण्याची शयता आहे. महाराष्ट्र राज्यात भाजपने ४८ पैकी ३० जागा आपल्याकडे घेतल्या असून शिवसेनेला (एकनाथ शिंदे गट) ११ तर राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) ७ जागा अंतिम झाल्याचे स्पष्ट होत आहे.

भाजप केंद्रीय नेतृत्वाने भाजपसाठी ३५ ते ३८ जागांचा प्रयत्न होता. तर मित्र पक्षासाठी केवळ १० ते १३ जागा सोडण्याचा प्रयत्न केला जात होता. यात अजित पवार गटाला केवळ तीन ते चार जागांवर समाधान मानावे लागणार होते. मात्र एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी भाजप नेतृत्वावर दबाव कायम ठेवला.
परिणामी दिल्लीत अनेक बैठका होऊनही जागावाटपाचे घोडे अडून राहिले होते. आता भाजपने काहीसे नमते धोरण घेत आणि ४०० वर जागा जिंकण्याचे उद्दिष्ट असल्याने मित्र पक्षांना काहीसे खुश करत जागा वाढवून देण्यास मान्यता दिली आहे.

दिल्लीत महाराष्ट्रातील जागावाटपावर अखेरची बैठक होऊन भाजप ३० शिवसेना ११ आणि राष्ट्रवादी ७ असा जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम केली असल्याची खात्रीलायक माहिती समजली आहे. त्यामुळे महायुतीच्या राजकीय वाटाघाटीत दक्षिण लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळतो की काय याकडे लक्ष लागून राहिले आहे.

जिल्हाध्यक्ष गायकवाड यांचेही सुतोवाच?
लोकसभा निवडणुकीसाठी आमदार नीलेश लंके व सौ. राणीताई लंके हे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे असुन गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्षांची बैठक घेऊन आढावा घेतला होता. ही बैठक झाल्यानंतर दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी यासंबंधीचे सुतोवाच करत वरिष्ठ पातळीवर यासंबंधी हालचाली सुरू झाल्या असल्याचे गायकवाड यांनी सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

लंकेंची दिल्लीस्वारी घड्याळ का तुतारी?
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके व सौ. राणीताई लंके लोकसभेच्या रिंगणात उतरणार असून सध्या प्रतिस्पर्धी म्हणून खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नावाची भाजपाकडून चर्चा चालू आहे. सध्या राज्यात महायुतीचे सरकार असुन आमदार लंके हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे विश्वासू आमदार मानले जातात. नगर शहरांमध्ये शिवपुत्र संभाजी महानाट्य निमित्ताने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या बरोबर आमदार लंके घराघरात पोहोचले असून आमदार लंके यांची लोकसभा दिल्ली स्वारी घड्याळ का तुतारी असा प्रश्न सध्या तरी अहमदनगर लोकसभा मतदारसंघात केला जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

घराणेशाहीला मतदान करणं बंद केलं तर?

राजाच्या विरोधात विचार मांडले तरी ते राजाने सहन करावे अन् त्यावर चिंतन करावे! तीच...

Ahmednagar Breaking: ब्रेकिंग बातमी! खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला!

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गणेश मंडळांच्या...

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणी तरी येणार अन्….; ‘त्या’ घोषणेची शरद पवार यांनी उडवली खिल्ली! श्रीगोंद्याचा उमेदवार ठरला?

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणीतरी येणार आणि आमच्या जागेवर हक्क सांगत लढण्याची भाषा...

Ahmednagar Politics News :’बोलबच्चन करून पाच-दहा वर्षे जनतेला फसविता येते’; खा. नीलेश लंके यांचा माजी खा. सुजय विखे यांना टोला

श्रीगोंदा | नगर सह्याद्री:- जनतेला बोलबच्चन करून पटवता येत नाही. बोलबच्चन करून पाच-दहा वर्ष जनतेला...