spot_img
अहमदनगरघर फोडायचा यांचा धंदाच, पाच वर्षांपूर्वी त्यांनी... ; विखेंची पवारांवर सडकून टीका

घर फोडायचा यांचा धंदाच, पाच वर्षांपूर्वी त्यांनी… ; विखेंची पवारांवर सडकून टीका

spot_img

संगमनेर / नगर सह्याद्री –
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील काल बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघात दौऱ्यावर होते. यावेळी थोरात समर्थक असलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच ठिकठिकाणी विखे पाटलांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. काल दिवसभर निलेश लंके आणि शरद पवारांची भेट चर्चेत राहिली होती. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी या भेटीवरून विरोधकांवर निशाणा साधला आहे. पाच वर्षांपूर्वी पवार यांनी असाच प्रयोग केला होता असे सांगत घर फोडायचा यांचा धंदाच आहे त्याचेच फळ ते भोगताहेत असे ते म्हणाले.

संगमनेर तालुक्यातील विविध गावात तब्बल 145 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन विखे पाटलांनी काल केलं. खांबे येथील सभेत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना निलेश लंके आणि शरद पवार यांच्या भेटीवर देखील भाषणातून निशाणा साधलाय. तसेच स्वतःला जाणता राजा म्हणवणाऱ्यांनी पाच वर्षांपूर्वी असाच प्रयोग करून पाहिला होता, अशी टीका देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
समोर कोण उभं राहिलं याचा मी फार विचार करत नाही. पाच वर्षांपूर्वी सुद्धा स्वतःला जाणता राजा म्हणवणाऱ्यांनी हा प्रयोग करून पाहिलाय. त्यावेळी तर आमच्या थोरल्या बंधूंना आमच्या विरोधात भाषण करायला लावली. लोकांचे घर फोडायचा यांचा धंदा आहे. मात्र आज त्यांचच घर फुटलं.परमेश्वराच्या दारात हे फेडावच लागतं. लोक विखे पाटलांना पाहून नव्हे तर भाजपच्या नेतृत्वाला पाहून मतदान करतात, असं विखे पाटील म्हणाले.

2019 च्या निवडणुकीत जनतेने भाजपा -शिवसेना युतीला मतदान केलं. मात्र उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केलं.विश्वासघाताचं राजकारण केलं. मात्र नियतीने वेगळंच ठरवलं होतं त्यामुळे आज सत्ता आपली आली, अशा शब्दांत विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

उपस्थितांना संबोधित करताना पुढे विखे पाटलांनी बाळासाहेब थोरात यांच्यावरही निशाणा साधला. संगमनेर तालुक्यात आम्ही केलेल्या कामांचं काहीजण भूमिपूजन उद्घाटन करतायत. पण जनतेला सगळं माहिती आहे. संगमनेरचे मॉडेल राज्याने घ्यावं असे इथले नेते सांगतात. या तालुक्यात 50 टँकर चालू आहे, हे मॉडेल राज्याने घ्यायचं का? आम्ही विकासाचं राजकारण करतो. रोजगारासाठी कधी या तालुक्यात मेळावा झाला का ?, असा सवाल यावेळी विखे पाटील यांनी उपस्थित केला. तसेच नाव न घेता थोरात यांच्यावर टीका केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जिल्हा बँकच असुरक्षीत असेल तर सारंच अवघड!

नोकरभरती मुद्यावर विखेंच्या जोडीने थोरातांचीही चुप्पी बरीच बोलकी | कर्डिलेसाहेब, तडा गेल्यास जोडणं अवघडं...

कोतकरांच्या अर्जावर शंकर राऊत यांचा आक्षेप; पत्रकार परिषदेत दिली मोठी माहिती..

अहमदनगर | नगर सह्याद्री:- अशोक लांडे खून प्रकरणात शिक्षा लागलेले संदीप, सचिन, अमोल कोतकर यांच्या...

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी अहमदनगर बंद!

अहमदनगर | नगर सह्याद्री मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ अहमदनगर येथील मराठा आंदोलकांनी आज...

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहिण’ योजनेचा तिसरा हप्त्याची तारीख ठरली; कधी होणार जमा? वाचा..

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे...