Earthquake in Maharashtra: महाराष्ट्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठवाड्यातील नांदेड , परभणी, हिंगोलीमध्ये 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले असून नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.
अधिक माहिती अशी: गुरुवारी सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी हिंगोली परभणी नांदेड या तीनही जिल्ह्यातील गावांना भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
3.6 तर 4.5 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी सहा वाजताच्या सुमारास झालेल्या भूकंपाच्या धक्क्यातील तीव्रतामुळे अनेक घरांच्या भिंतीना छोट्या भेगा पडल्या आहे.
दुसऱ्या भूकंपाच्या धक्क्यातील तीव्रता जास्त असल्याचं देखील नागरिकांनी सांगितलं. भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यानंतर घाबरलेले नागरिक देखील घराबाहेर पडले.