मुंबई। नगर सहयाद्री-
मार्च महिन्यात महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. एकीकडे दिवसा उन्हाचा कडाका अन् रात्री अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे तर दुसरीकडे अवकाळीचं संकट कधी दूर होईल, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. अशातच हवामान खात्याने पुढील ४८ तासांत देशातील अनेक राज्यांना अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.
काल काही राज्यातील भागात अवकाळी पावसाच्या रिमझीम धारा बरसल्या आहे. आज अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या पूर्वोत्तर आणि पूर्व भारतीय राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या मराठवाडा आणि विदर्भात शुक्रवार आणि शनिवारी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, चंद्रपूर गोंदिया आणि वाशिममध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.