Job: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात (AIIMS) मध्ये नोकरी भरती प्रक्रिया राबवली जात असूनभरतीअंतर्गत एकूण १०० पदांवर पात्र उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.
विशेष म्हणजे या नोकरीसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार नाही. AIIMS मधील विविध पदांसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी (MD, MS किंवा DNI) असणं आवश्यक आहे. या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 67,700 रुपये वेतन दिले जाणार आहे.
भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2024 आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला sr.recruitment@aiimsdeoghar.edu.in या साईटवर जावे लागेल. याच साईटवर आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती मिळेल.