अहमदनगर / नगर सहयाद्री : नगर तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आज सकाळी (२५ मार्च) नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथे लागलेल्या आगीत दोन मुलींसह आई मृत झाल्याची घटना घडली असल्याची माहिती समजली आहे. सकाळी ९ वाजता ही घटना घडली. लीलाबाई सुनील लांडगे (आई), साक्षी व ख़ुशी (मुली) अशी मृतांची नावे आहेत. लीलाबाई यांचे पती सुनील लांडगे याने त्यांच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिल्याची चर्चा आहे.