Electric Scooters: वाहनप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे.आता इलेक्ट्रिक स्कूटरची क्रेझ वाढताना दिसत आहे. तुम्हीदेखील जर इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल, तर एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. बजाज ऑटो लवकरच इलेक्ट्रिक सेगमेंट आपल्या लोकप्रिय चेतक लाइनअपमध्ये एक नवीन व्हॅरिएंट लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. बजाज चेतकच्या नवीन व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 1 लाख रुपयांपेक्षा कमी असू शकते.
गेल्या काही वर्षांत भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक स्कूटरच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटर आणि अथर यांसारख्या स्कूटर्सचे या सेगमेंटमध्ये आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. आता स्वदेशी दुचाकी उत्पादक कंपनी बजाज ऑटो लवकरच नवीन व्हॅरिएंट लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
बजाज चेतकचा नवीन व्हेरियंट एप्रिल किंवा मे मध्ये लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. याची एक्स-शोरूम किंमत 1 लाख रुपयांपेक्षा कमी असू शकते. बजाज चेतकचा नवीन व्हेरियंट लॉन्च झाल्यानंतर याची स्पर्धा TVS iQube, Ather 450S आणि Ola S1 सारख्या बाजारात उपलब्ध असलेल्या इतर स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरशी होईल.