अहमदनगर | नगर सह्याद्री
आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. सुरवातीला आंबा बाजारात आली की त्यांच्या किमती प्रचंड असतात. यंदा देखील हीच स्थिती होती. परंतु आता सर्वच प्रकारच्या आंब्यांची आता बाजारपेठेत आवक वाढल्याने सुरुवातीला चढा भाव असलेला आंबा आता सर्व सामान्य ग्राहकांच्या आवायात आला आहे. भाव कमी झाल्याने खरेदीदारांची गर्दी सध्या होताना दिसत आहे.
सुरुवातीला २१०० रुपये दोन डझन असलेला रत्नागिरी व देवगढ हापूस आता १२०० ते १५०० रुपयांत येत आहे. हापूसचे दर कमी झाले असून, त्यांच्यापाठोपाठ इतर आंब्यांच्या दरात घसरण झाली आहे. आंबा आता सर्वसामान्यांच्या आवायात आला आहे.
हापूस आंब्यांपाठोपाठ म्हैसूर, लालबाग आंबा साधारण २०० ते ५०० रुपये प्रति दोन डझन आहे. भाव आवायात आल्याने आंबा खरेदिसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी सुरु केली असल्याची माहिती पप्पुसेठ पमनदास आहुजा फळपेढीचे संचालक जगदिश व कैलास आहुजा यांनी दिली.