spot_img
अहमदनगरAgriculture News: 'सोयाबीन पिकाची उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक' 'यांनी' केले सविस्तर मार्गदर्शन

Agriculture News: ‘सोयाबीन पिकाची उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक’ ‘यांनी’ केले सविस्तर मार्गदर्शन

spot_img
अहमदनगर ।  नगर सहयाद्री
तालुका कृषी अधिकारी, अहमदनगर यांच्या वतीने खरीप हंगामपूर्व तयारी मोहिमेंतर्गत नगर तालुक्यातील मौजे देहरे शिवारात सोयाबीन पिकाची उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक घेण्यात आले. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी सिद्धार्थ क्षीरसागर, मंडळ कृषी अधिकारी विजय सोमवंशी, गावचे सदस्य, संचालक, शेतकरी गट, कंपनीचे सदस्य व सोयाबीन उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना तालुका कृषी अधिकारी सिद्धार्थ क्षीरसागर म्हणाले की, ओल्या गोणपाटावर कोणतेही 100 दाणे 1010 आकारात ठेवून गोणपाटाची व्यवस्थित गुंडाळी करून ते 6-7 दिवस सावलीत चांगले पाणी मारून वाफसा पसीस्थीत ठेवावे. 5-6 दिवसानंतर 100 पैकी चांगले उगवून मोड आलेले दाण्यांची मोजणी करावी. 70% पेक्षा जास्त उगवण असल्यास शिफारसप्रमाणे एकरी बियाणे वापरून पेरणी करावी. 60% पेक्षा कमी उगवण आल्यास बियाणे पेरणीसाठी वापरू नये, अशी माहिती त्यांनी शेतकऱ्यांना दिली.
क्षीरसागर पुढे म्हणाले की, तालुक्यातील सोयाबीन पिकाचे क्षेत्र वाढत असून, तालुक्यात यंदा 16,500 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी होण्याचा अंदाज आहे. कृषी विभागाच्या योजनेंतर्गत वैयक्तिक वा गटांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग चालू झाल्यास शेतकरी बांधवांना त्याचा लाभ होईल. नगर तालुक्यात 991 शेतकरी बांधवानी 9,365 क्विंटल घरगुती बियाणे ठेवले असून, या सर्वांनी उगवण क्षमता तपासून पाहावी व पेरणी अगोदर बीजप्रक्रिया करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कृषी पर्यवेक्षक विजय सोमवंशी यांनी शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी उगवण क्षमता, बीज प्रक्रिया, माती परीक्षणानुसार खतांचा वापर व एकात्मिक किड रोग व्यवस्थापन या तंत्रज्ञानाचा वापर करणेबाबत आवाहन केले. कृषी सहाय्यक कविता मदने यांनी पेरणीसाठी ठेवलेल्या घरगुती सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्याची गरज व पद्धत या विषयावर शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
या खरीप हंगामपूर्व मोहीम विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, उपविभागीय कृषी अधिकारी पोपटराव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली व  सूचनेनुसार राबविण्यात येत आहे. कार्यक्रमाचे नियोजन कृषी सहाय्यक कविता मदने, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी यांनी केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

MLA Sangram Jagtap: खुशखबर! नगरमध्ये २० इलेट्रिक बस धावणार; आमदार जगताप काय म्हणाले पहा…

अहमदनगर | नगर सह्याद्री नगर एमआयडीसी मधील कामगारांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी उद्योजकांनी बस...

Politics News: पारनेरमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी! ‘यांनी’ दिला मोठा इशारा

Politics News: अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर-नगर मतदारसंघात (Parner-Nagar Matadarasaṅgha) महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण...

Badlapur encounter case: बदलापूर एन्काउंटर प्रकरणात नवा ट्विस्ट; अक्षय शिंदेवर गंभीर गुन्हा दाखल

मुंबई | नगर सह्याद्री:- बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी (ता. २३) पोलीस...

Ahmednagar Rain Update: परतीच्या पावसाने जिल्ह्याला झोडपले!

नगर, पारनेर, राहुरीत दमदार पाऊस | सरासरी १२९ मिलीमीटर पावसाची नोंद अहमदनगर | नगर सह्याद्री:- परतीच्या...