spot_img
ब्रेकिंग..तर मुंडे कुटुंबीय लोकप्रतिनिधी झाले असते का? पंकजा मुंडेंच्या 'त्या' वक्तव्यावर मनोज...

..तर मुंडे कुटुंबीय लोकप्रतिनिधी झाले असते का? पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर मनोज जरांगेंचा सणसणीत टोला

spot_img

बीड । नगर सह्यद्री
तुम्ही आम्हाला विरोधक समजत असाल तर मराठे कसे निवडून देतील तुम्हाला? मराठे जातीयवादी असते तर मुंडे कुटुंबीय लोकप्रतिनिधी झाले असते का? तुम्ही आहात तरी किती? असा सवाल सहर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील ( Manoj Jaraje Patil ) यांनी पंकजा मुंडे यांना केला आहे.

मराठा आरक्षण आंदोलानासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील ( Manoj Jaraje Patil ) यांनी दि. ११ मे रोजी बीड मधील माजलगावमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठे जातीयवादी असल्याचा आरोपवार प्रतिउत्तर दिले आहे.

मनोज जरांगे म्हणाले, मराठे जातीयवादी असल्याचा आरोप केला जात आहे. पण आम्ही जातीयवादी असतो तर दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे मंत्री, खासदार झालेच नसते. पंकजा मुंडे आणि धनंजय मुडे हे आमदार झाले नसते, प्रीतम मुंडे खासदार झाल्याच नसत्या.

तुम्ही जर मराठ्यांना विरोधक समजत असाल तर मराठे तुम्हाला कसे निवडून देतील? तुम्ही आहात तरी किती? आम्ही एकटे मराठेच साडेसहा लाख आहोत, त्यात मुस्लीम तीन लाख मिसळले तर खाली काय राहते?, असा सवाल जरांगेंनी केला आहे.

माझ्या जिल्ह्यात जातिवादाचे विषारी राजकारण
खासदार विखेंच्या प्रचार सभेत पंकजा मुंडे यांनी माझ्या जिल्ह्यात जातिवादाचे विषारी राजकारण होत आहे, पण मी गोपीनाथ मुंडे यांची लेक आहे. एका मराठा बांधवासाठी (डॉ. सुजय विखे) मी येथे आली आहे. माझ्या जिल्ह्यातील लोकांनी ते पहावे. जातपात, धर्म न मानणाऱ्या पक्षात आम्ही आहोत, असे प्रतिपादन केले होते.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भूमिपुत्रांच्या उपोषणाकडे राजकीय पुढाऱ्यांची पाठ

भूमिपुत्रांच्या उपोषणाकडे राजकीय पुढाऱ्यांची पाठ प्रशासकीय अधिकारी सुद्धा फिरकलेच नाहीत पाण्याच्या प्रश्नावर पारनेर तहसीलवर सुरू आहे...

पाऊस आला अन पूलच गेला वाहून! नागरिकांची प्रतिक्रिया काय?

निघोज | नगर सह्याद्री:- निघोज परिसरात बुधवार दि.२५ रोजी दुपार पासून ते मध्यरात्री उशिरा पर्यंत...

१५ लाखांची क्षणांत फसवणूक! व्यावसायिकासोबत नेमकं काय घडलं..

अहमदनगर | नगर सह्याद्री:- बिटकॉइन ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष...

महापालिका कर्मचारी भरती प्रक्रिया रखडली; कारण काय?

अहमदनगर | नगर सह्याद्री:- महापालिकेची १३४ पदांची कर्मचारी भरती प्रक्रिया पुन्हा रखडली आहे. सातवा वेतन...