spot_img
अहमदनगरAhmednagar: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी बजावला मतदानाचा हक्क! मतदारांना केले मोठे आवाहन,...

Ahmednagar: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी बजावला मतदानाचा हक्क! मतदारांना केले मोठे आवाहन, पहा काय म्हणाले..

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना राळेगणसिद्धीमध्ये मतदानाचा अधिकार बजावला आहे. या वेळी अण्णा हजारेंनी कोणाला मतदान करावे याविषयी मतदारांना सल्ला दिला आहे. पक्ष आणि व्यक्ती न पाहता आपण मतदान करणारा उमेदवार चारित्र्यशील, विचारशील आणि निष्कलंक असला पाहिजे, असे अण्णा हजारे म्हणाले. तसेच देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल तर मतदाराची जबाबदारी फार महत्त्वाची आहे, असे अण्णा हजारे म्हणाले. ते राळेगणसिद्धीमध्ये माध्यमांशी बोलत होते.

अण्णा हजारे म्हणाले, ज्यांना मतदान करायचे त्यांनी मागच्या काळात काय केले ते पाहणे महत्त्वाचे आहे. तो मतदारसंघासाठी किती झिजला, दिव्यासारखा किती जळला हे पाहणे गरजेचे आहे. ते पाहूनच मतदान करा. मतदाराने मतदान करताना खालील गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. मतदाराने मतदान करताना खालील गोष्टी लक्षात गरजेचे आहे.

मत देताना तो आचारशील, विचारशील, निष्कलंक जीवन, अपमन सहन करण्याची शक्ती हे गुण पाहिजे. तो दिव्यासारखा झटत राहिला पाहिजे. मतदाराने ज्यांना मतदान करायचे त्याचे चारित्र्कसे आहे. त्याचे आचार- विचार कसे आहे? त्याचे जीवन निष्कलंक आहे का? दाग लागलेले आहे का? हे पाहिले पाहिजे. खरी लोकशाही आणायची असेल तर मतदारांची जबाबादारी महत्त्वाची आहे.

मतदान केले पाहिजे. मी पक्ष पाहत नाही स्त्री किंवा पुरुष असेल तरी त्याचे चारित्र्य चांगले पाहिजे. हा देश कोणी चालवायचा त्याची चावी कोणाच्या हातात द्यायची हे ठरवायचे आपल्या हातात आहे. मतदाराच्या हाती चावी आहे. योग्य चावी लावली पाहिजे. चावी चुकीच्या हातात गेली तर देशाचे वाटोळे होईल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठेवीदारांच्या प्रश्नांच्या सरबत्तीवर चेअरमन रामदास भोसले यांची समर्पक उत्तरे

ठेवीदारांच्या प्रश्नांच्या सरबत्तीवर चेअरमन रामदास भोसले यांची समर्पक उत्तरे सेनापती बापट पतसंस्थेचा मेळावा पारनेर येथे...

सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य; माझा लढा तोपर्यंत संपणार नाही…, नेमकं काय म्हणाल्या..

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) नेत्या सुप्रिया सुळे यांनी, “जोपर्यंत त्यांना...

नगरमध्ये कोतकर-जगताप संघर्ष नव्या वळणावर!

राजकीय ताकद कोणामुळे कोणाला अन् कोणाला मोजावी लागली किंमत! महापौर पदानंतर कोतकरांना मिळाल्या होत्या...

Raj Thackeray : लाडकी बहीण योजनेबाबत राज ठाकरेंचे मोठे विधान.. नेमकं काय म्हणाले पहा..

अमरावती / नगर सह्याद्री - महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आहे. लाडकी...