spot_img
अहमदनगरअहमदनगर जिल्ह्यात पाण्याचा ठणठणात! सहा लाख नागरिक भागवतायेत 'ईतक्या' टँकरच्या पाण्याने तहान

अहमदनगर जिल्ह्यात पाण्याचा ठणठणात! सहा लाख नागरिक भागवतायेत ‘ईतक्या’ टँकरच्या पाण्याने तहान

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
नगर विभागातील पाणीटंचाईची स्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होत आहे. जिल्ह्यातील अनेक गावे पाणीटंचाईच्या विळख्यात सापडली आहेत. प्रशासनातर्फे ३१२ टँकरने २९१ गावे व १५४४ वाडी-वस्तीवरील ५ लाख ७० हजार लोकांना पाणीपुरवठा सुरू आहे.

अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर व शिर्डी या दोन्ही मतदार संघात निवडणुका पार पडल्या. यामध्ये प्रशासन, नेते मंडळी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्तेही बिझी होते. त्यामुळे अनेकांना पाणी टंचाईकडे लक्ष द्यायला वेळच पुरला नही.परंतु आता ही निवडणूक संपल्याने तहानलेल्या लोकांना पाणीपुरवठा करण्यावर प्रशासनाला भर द्यावा लागणार आहे. सध्या जिल्ह्यात ३१२ टँकरने २९१ गावे व १५४४ वाडी-वस्तीवरील ५ लाख ७० हजार लोकांना पाणीपुरवठा सुरू आहे. ग्रामीण भागात पाण्याचे उद्भव कोरडे पडू लागल्याने दिवसेंदिवस टँकरच्या मागणीत वाढ होत आहे.

गेल्या दीड महिन्यांपासून जिल्हा प्रशासन लोकसभा निवडणुकीत व्यस्त होते. परंतु आता निवडणुका संपल्याने पाणीटंचाईला प्राधान्य द्यावे लागणार आहे. त्यातच अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे काही ठिकाणी सुरू असल्याने पंचनामे करण्यासाठी तारेवरची कसरत प्रशासनाला करावी लागत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षी सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाल्याने जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात टँकरच्या मागणीला सुरुवात झाली.

अर्थात टँकरची निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यास फेब्रुवारी महिना उजाडला. त्यानंतर खर्‍या अर्थाने टँकरमध्ये वाढ होऊ लागली. आज अखेर जिल्ह्यात ३१२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सर्वाधिक पाणीटंचाईची तीव्रता पाथर्डी तालुक्यात असून निम्म्याहून अधिक तालुक्याला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

सध्या या तालुक्यात ८३ गावे ४२९ वाड्यांवरील तब्बल १ लाख ६६ हजार ९९२ लोकांना ९९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये टँकर सुरू झाले आहेत. तसाच पाणीपुरवठा आता शहरी भागात म्हणजे नगरपालिका हद्दीमध्ये देखील करावा लागत आहे. सध्या पाथर्डी, कर्जत, पारनेर, श्रीगोंदा व शेवगाव या पाच नगरपालिका हद्दीत २७ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शहरातून कोतकर कुटुंबीयांना उमेदवारी नकोच!; शहर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा ‘लेटरबाँब’!

नगर शहरातील राजकारणाच्या झालेल्या गुन्हेगारीकरणाला कायमस्वरूपी आळा घालण्याची मागणी/  कोतकरांच्या ‘मविआ’तील उमेदवारीत मोठा अडसर अहमदनगर...

पुन्हा एका मल्टिस्टेटच्या चेअरमनला अटक; ‘इतक्या’ कोटींचा गैरव्यवहार

अहमदनगर | नगर सह्याद्री:- परळी पीपल्स मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या ११ कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे...

सुप्याच्या सरपंच मनीषा रोकडे यांना दिलासा; ‘ती’ मागणी फेटाळली

अतिक्रमण मुद्द्यावरून सरपंचपद रद्द करण्याची मागणी फेटाळली पारनेर | नगर सह्याद्री:- अतिक्रमणाच्या मुद्यावरुन सुप्याच्या सरपंच मनिषा...

जगतापांच्या विरोधात गाडेंनी थोपटले दंड

शहरात आरोग्य शिबिरातून साखरपेरणी | तयारीला लागण्याच्या पदाधिकार्‍यांना सूचना अहमदनगर | नगर सह्याद्री:- आगामी विधानसभा निवडणुकीची...