spot_img
अहमदनगरमराठा समाज आक्रमक! आंदोलकांनी रस्त्यावर उतरत जाळले टायर

मराठा समाज आक्रमक! आंदोलकांनी रस्त्यावर उतरत जाळले टायर

spot_img

धाराशिव | नगर सह्याद्री
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती उत्सवादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्ध धाराशिव जिल्ह्यात सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. या लाठीचार्जच्या विरोधात एकत्र येत मराठा समाजाच्या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या घटनेनंतर जिल्ह्यातील वातावरण चांगलच तापले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिवमध्ये सकल मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. धाराशिवमध्ये संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर मराठा समाजाच्या आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ रस्त्यावर टायर जाळले.पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या कारणावरून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

मराठा समाजाच्या आंदोलकांनी पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलकांनी पोलीस अधिक्षक कार्यालयासमोरील रस्त्यांवर टायर जाळले. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.दरम्यान, पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या विरोधात मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेत मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचले.

यावेळी घोषणाबाजी केलील. त्यानंतर समाजाच्याकार्यकर्त्यांनी पोलिस अधिक्षकांना निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी लाठीचार्ज करणार्‍या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केली.

४ जूनपासून उपोषण सुरु करणार:  मनोज जरांगे
उपोषणाची घोषणा करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा कोणत्याही पक्षाचा असू द्या. दहा टक्के आरक्षण दिलं ते कुणाचेही नाही. यामुळे मुलांचे वाटोळे झाले आहे. ४ जून रोजी सकाळी नऊ वाजता उपोषण सुरू होणार आहे. या लढ्यात सामील होण्यासाठी माझ्या समाजाला आव्हान करायची गरज नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये मी नाही. आम्ही कुणाचा प्रचार केला नाही. कुणाला निवडून आणण्याचेही आम्ही आवाहन केलेले नाही. आमचा महाविकास आघाडी किंवा महायुतीला पाठिंबा नव्हता. मी फक्त उमेदवारांना पाडण्याचे आवाहन केले. कोणाला पाडायचे हे मराठा समाजाल कळालेलं आहे, असे त्यांनी म्हटले.

जरांगे पाटलांनी उपोषण करू नये, आम्हाला आदेश द्यावा: अहमदनगरमधील मराठा बांधवांची भूमिका
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी ४ जूनपासून पुन्हा एकदा उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मनोज जरांगे यांनी उपोषण करू नये, त्यांची तब्येत ही खालावलेली असून डॉटरांनी त्यांना उपोषण करू नये असा सल्ला दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा आदेश द्यावा आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत असा अशी भूमिका अहमदनगर येथील मराठा कार्यकर्त्यांनी घेतली आहे. मराठा आंदोलक म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी मागील आठ महिन्यांपासून आंदोलन उभे केले. मात्र सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. सरकार ठोस भूमिका घेत नाही म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा ४ जूनपासून उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा बांधव म्हणून मनोज जरांगे पाटील यांना आमची मागणी आहे की, त्यांनी उपोषण करू नये. तुम्ही रस्त्यावर उतरून लढण्याचे आदेश द्या, तुमच्या पाठीशी मराठा समाज खंबीरपणे उभा राहील. तुम्ही जी रणनिती ठरवाल त्याचे मराठा समाज पालन करेल. मनोज जरांगे पाटलांनी त्यांच्या तब्येतीमुळे आंदोलन करू नये, अशी मागणी यावेळी मराठा बांधवांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शहरातून कोतकर कुटुंबीयांना उमेदवारी नकोच!; शहर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा ‘लेटरबाँब’!

नगर शहरातील राजकारणाच्या झालेल्या गुन्हेगारीकरणाला कायमस्वरूपी आळा घालण्याची मागणी/  कोतकरांच्या ‘मविआ’तील उमेदवारीत मोठा अडसर अहमदनगर...

पुन्हा एका मल्टिस्टेटच्या चेअरमनला अटक; ‘इतक्या’ कोटींचा गैरव्यवहार

अहमदनगर | नगर सह्याद्री:- परळी पीपल्स मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या ११ कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे...

सुप्याच्या सरपंच मनीषा रोकडे यांना दिलासा; ‘ती’ मागणी फेटाळली

अतिक्रमण मुद्द्यावरून सरपंचपद रद्द करण्याची मागणी फेटाळली पारनेर | नगर सह्याद्री:- अतिक्रमणाच्या मुद्यावरुन सुप्याच्या सरपंच मनिषा...

जगतापांच्या विरोधात गाडेंनी थोपटले दंड

शहरात आरोग्य शिबिरातून साखरपेरणी | तयारीला लागण्याच्या पदाधिकार्‍यांना सूचना अहमदनगर | नगर सह्याद्री:- आगामी विधानसभा निवडणुकीची...