spot_img
ब्रेकिंगPolitics News: बहुमत मिळाले नाही तर भाजपाचा प्लॅन बी? केंद्रीय गृहमंत्री अमित...

Politics News: बहुमत मिळाले नाही तर भाजपाचा प्लॅन बी? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले विश्लेषण

spot_img

Politics News: लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम आता शिगेला पोहोचला आहे. २० मे रोजी पाचव्या टप्प्याचे मतदान संपन्न होईल. या मतदानाच्या माध्यमातून दक्षिणेतील राज्यांचे मतदान जवळपास पूर्ण होणार असून त्यानंतर उत्तर भारत, पश्चिम बंगाल अशा उर्वरित राज्यांवर लक्ष केंद्रीत केले जाईल.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एएनआय वृत्तसंस्थेला नुकतीच एक मुलाखत दिली. भाजपाला बहुमताचा आकडा गाठता आला नाही, तर भाजपाकडे प्लॅन बी काय आहे? असा प्रश्न या मुलाखतीमध्ये त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी भाजपाला किती जागा मिळू शकतात? याचे विश्लेषण केले.

भाजपाला २७२ पेक्षा कमी जागा मिळाल्या तर पुढील रणनीती काय असेल? असा प्रश्न विचारल्यानंतर अमित शाह म्हणाले की, आम्हाला तशी कोणतीही शयता वाटत नाही. पंतप्रधान मोदी यांच्या योजनांचा लाभ मिळालेला ६० कोटींचा जनाधार आमच्याकडे आहे. या लाभार्थी गटात कोणत्याही एका जाती-धर्माचे, वयोमानाचे लोक नाहीत.

या लाभार्थ्यांना नरेंद्र मोदी काय आहेत आणि त्यांच्यासाठी ४०० जागा का जरूरी आहेत, याची कल्पना आहे. आम्हाला प्लॅन बी ची गरजच नाही, कारण आमचा प्लॅ ए यशस्वी होणार आहे, असेही अमित शाह म्हणाले.प्लॅन ए यशस्वी होण्याची जेव्हा ६० टक्केच शयता असते, तेव्हाच प्लॅन बीची गरज निर्माण होते. पण मला विश्वास आहे की, मोठ्या बहुमताने पंतप्रधान मोदी तिसर्‍यांदा सत्ता स्थापन करतील.

भाजपाकडून उत्तर भारत आणि दक्षिण भारत असा दुजाभाव केल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. यावर बोलताना अमित शाह म्हणाले, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये भाजपा हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल. एखादा नेता राज्याला स्वतंत्र देश म्हणून घोषित करत असेल तर हे आक्षेपार्ह आहे.

हा देश कधीच वेगळा होऊ शकत नाही. काँग्रेसचा मोठा नेता देशाच्या विभाजनाबद्दल विधान करतो आणि काँग्रेस पक्ष त्या विधानाचा साधा निषेधही करत नाही किंवा त्यापासून अंतरही राखत नाही. देशातील नागरिकांनी काँग्रेसचा अजेंडा समजून घ्यावा. दक्षिणेतील राज्यात भाजपा हा एकमेव मोठा पक्ष म्हणून समोर येईल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सावेडीतील बहुचर्चित मॉडेल रोडची काळेंकडून पोल खोल; दीड वर्षात रस्ता गायब

चार कोटींवर डल्ला | दीड वर्षात रस्ता गायब अहमदनगर | नगर सह्याद्री सावेडी उपनगरातील बहुचर्चित मॉडेल...

धक्कादायक! महिलेची पावणे दोन कोटींची फसवणूक, असा घडला प्रकार…

अहमदनगर | नगर सह्याद्री केडगाव येथील महिलेच्या नावावर काही व्यावसायिकांनी अशोक सहकारी बँकेतून एक कोटी...

डॉ. सुजय विखेंचा थोरातांवर हल्लाबोल, काय म्हणाले पहा…

शिर्डी | नगर सह्याद्री मतदारसंघातील खंडकरी शेतकऱ्यांच्या जमीनीचा आणि संस्थानातील कंत्राटी कामगारांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित...

विखेंची कोंडी करताना थोरातांचीच होऊ नये म्हणजे बरं!

सारीपाट / शिवाजी शिर्के नगरच्या किल्ल्याचा किल्लेदार ठरवला जाणार | लोणीत तळ ठोकला असला तरी...