अहमदनगर | नगर सह्याद्री
नगर जिल्ह्यात मान्सून दमदार बरसत असून बुधवारी दुपारी जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. दुपारी ४ वाजता नगर शहर आणि परिसरात सर्वत्र जोरदार पाऊस कोसळला. या पावसाने ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले. नगर शहरात दुपारपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.
रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन चालकांना प्रवासादरम्यान कसरत करावी लागली. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे बाजारपेठीतील रस्ते पाण्याखाली गेले होते. यामुळे व्यावसायिकांसह खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचे हाल झाले.मृग नक्षत्र सुरू होताच दुष्काळी परिस्थितीचे चटके सोसलेला नगर तालुका मृगाच्या सरींनी सुखावला. बुधवारी दिवशी तालुयातील विविध भागात दमदार पावसाने हजेरी लावली.
केडगाव, चास, कामरगाव, भोयरे पठार, भोरवाडी, अकोळनेर, सारोळा कासार तसेच जेऊर, इमामपुर, बहिरवाडी, ससेवाडी आदी भागात जोरदार पावसाची बॅटींग झाली. तालुयात सर्वत्र पेरणीयोग्य पाऊस झाला असल्याने बळीराजा सुखावला आहे. दरम्यान नगर तालुयातील ससेवाडीत ढगफुटी झाल्याने सीना नदीला पुर आला होता. जेऊर बाजार तळ पाण्यात गेले आहे.